Next
‘ओरिफ्लेम’ची ‘ऑप्टिमल्स इव्हन आउट’ श्रेणी
प्रेस रिलीज
Thursday, February 22 | 06:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ऊन आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे त्वचेचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. योग्य उत्पादने वापरुन आपण झालेले नुकसान भरून काढू शकतो आणि पुन्हा एकसारखी, तेजस्वी त्वचा मिळवू शकतो. हा विचार करून ओरिफ्लेम इंडिया या थेट विक्रीच्या अग्रेसर सौंदर्यप्रसाधन ब्रॅंडने ‘ऑप्टिमल्स इव्हन आउट’ ही आपली अत्यंत प्रेरक आणि अद्भुत उत्पादनांची श्रेणी सुरू केली आहे.

या श्रेणीत क्लिंझिंग फोम, टोनर, डोळ्याचे क्रीम, दीपवून टाकणारे सिरम, दिवसा वापरायचे संरक्षणात्मक क्रीम आणि त्वचेचे नुकसान भरून काढणारे नाइट क्रीम यांचा समावेश आहे. ही श्रेणी तुमच्या त्वचेची निगा रखण्यासाठी तुमच्या दैनंदिन गरजा भागवते आणि काही मोजक्या सहज टप्प्यात तुम्हाला नैसर्गिकरित्या तेजस्वी आणि एक सारखी, निर्दोष त्वचा देते.

तेजस्वी त्वचेची आस असलेल्या सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी बनवलेली ‘ऑप्टिमल्स इव्हन आउट’ ही श्रेणी ‘ओरिफ्लेम’च्या शास्त्रज्ञांनी काटेकोरपणे बनवली आणि विकसित केली आहे व त्यामध्ये स्वीडिश घटकांचे मिश्रण आणि त्वचा-उजळणारे ल्यूमीलाईट कॉम्प्लेक्स समाविष्ट आहे, जे एकत्रितपणे त्वचेवर असलेले काळे डाग किंवा इतर कोणतेही धब्बे कमी करण्यास मदत करते. शिवाय याचे प्रदूषण-विरोधी सक्रिय घटक त्वचेवर संरक्षणात्मक कवचाप्रमाणे कार्य करते आणि त्वचेस अकाली वृद्ध करणाऱ्या, त्वचेची झळाळी कमी करणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण अशी त्वचेची आर्द्रता शोषून घेणाऱ्या प्रदूषणासारख्या पर्यावरणीय प्रभावांचा सामना करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link