Next
अनामिक
BOI
Tuesday, October 24 | 06:25 PM
15 0 0
Share this story

अनेक व्यक्ती वेगवेगळ्या नात्यांनी आपल्या आयुष्यात येत असतात. काही नात्यांना नाव असते, काहींना नसते. ज्यांना नाव नसते, अशी अनामिक नातीही लक्षात राहतात. कारण ती काही ना काही देऊन जातात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली ही नाती कधी कधी आयुष्य बदलवून टाकायलाही कारणीभूत ठरतात, तर काही नाती वेगळी दृष्टी देऊन जातात. अशा नात्यांवर आधारित कथांचा हा संग्रह आहे.

वैशाली फाटक-काटकर यांच्या ‘तुझ्या-माझ्यात’, ‘लपंडाव’, ‘रियुनियन’ आणि ‘गेले... ते दिन गेले’ या कथांचा समावेश या संग्रहात आहे. या सगळ्या कथा शहरी वातावरणात घडलेल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरांमधील आहेत. कथांमधली पात्रेही आधुनिक जीवन जगणारी आणि आधुनिक जगातील प्रश्नांना सामोरी जाणारी आहेत.

प्रकाशक : अभिषेक टाइपसेटर्स अँड पब्लिशर्स
पाने : २३९
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link