Next
ठाण्यात विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली
BOI
Monday, April 22, 2019 | 11:20 AM
15 0 0
Share this article:


शहापूर : यंदाच्या लोकसभा जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकट करण्याच्या हेतूने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किन्हवली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २० एप्रिल २०१९ रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानाचा संदेश दिला. 

महाविद्यालय ते किन्हवली बाजारपेठ- बस स्टॅंड ते पुन्हा महाविद्यालय अशी मार्गक्रमणा या रॅलीने केली. घोषवाक्य, फलक यांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती केली व मतदान करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सुषमा हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखालीं संपूर्ण किन्हवली परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. अत्यंत शिस्तीत निघालेल्या या रॅलीतील विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’, ‘लोकशाही बळकट करा’, ‘मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे’, ‘मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे’, असे फलक हातात घेऊन मतदानाबाबत जनजागृती केली. 


या प्रसंगी डॉ. हसबनीस यांनी मतदानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयीन युवकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत त्यांनी आपल्या जवळच्या अपंगाना, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याच्या, नातेवाईक व शेजाऱ्यांनादेखील मतदान करण्यास सांगण्याचे आवाहन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search