Next
अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, December 10, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this article:



पुणे : गुरुकुल विश्वपीठातर्फे आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री, ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू-मोडक यांच्या हस्ते नऊ डिसेंबर २०१८ रोजी झाले.

कोरेगाव पार्क येथील मौलाना आझाद सभागृहात आयोजित या संमेलनाला संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी, राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे, डॉ. मधुसूदन घाणेकर, पल्लवी भागवत उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलताना उद्घाटक प्रतिभा मोडक म्हणाल्या, ‘ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले, तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते.’



त्यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलताना मारटकर यांनी २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘पाच राज्यांतील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश अटीतटीची लढत होईल. तेलंगणमध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकात सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेची पुन्हा संधी असून, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या, तर युतीला लाभ मिळेल; मात्र, नंतर घेतल्यास जड जातील’.

‘नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष’, ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, ‘दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष’, ‘हस्ताक्षर आणि ज्योतिष’, ‘नक्षत्र आणि ज्योतिष’, ‘नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव’ अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे आयोजित करण्यात आली होती.

ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे, डॉ. श्रीहृदय भागवत, रजनी साबदे आदी मान्यवरांनी विविध व्याख्यान सत्रांत मार्गदर्शन केले.

सायंकाळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search