Next
डॉ. अनंत देशमुख यांना ‘कोमसाप’चा ‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्कार
कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०१८-१९चे पुरस्कार जाहीर
BOI
Monday, February 25, 2019 | 12:33 PM
15 1 0
Share this article:

डॉ. अनंत देशमुखरत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) २०१८-१९चे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी जाहीर केले. ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ‘कोकण साहित्य भूषण’ या सन्मानाने गौरविण्यात येणार असून, ‘निद्रानाश’ या नव्या कवितासंग्रहासाठी महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी १० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या साहित्यावर दोन तासांचा जाहीर कार्यक्रम, असे या दोन पुरस्कारांचे स्वरूप आहे.

समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे’ यांचे आठ खंडातील चरित्र लिहून डॉ. देशमुख यांनी मराठी साहित्यात मोठी ठळक कामगिरी केली आहे. श्रीधर बळवंत टिळक, रँग्लर परांजपे, वि. द. घाटे यांची चरित्रेही देशमुखांच्या लेखन कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे आहेत, तर प्रखर राजकीय व सामाजिक जाणीवेची, समकाळाची तल्खली व्यक्त करणारी बहुपेडी कविता हे डॉ. केळुसकर यांच्या ‘निद्रानाश’ (मौज प्रकाशन) या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य असून, मराठी कविताविश्‍वात या संग्रहाची सध्या विविध स्तरांमध्ये चर्चा आहे.

महेश केळुसकर‘कोकण साहित्य भूषण सन्मानप्राप्त लेखक आणि कविता राजधानी पुरस्कारप्राप्त कवींची छायाचित्रे, वाङ्मयीन कारकीर्द माहिती आणि निवडक कविता व साहित्यांस ‘कोमसाप’च्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलातील नव्या साहित्य दालनात प्रदर्शित करण्यात येईल,’ असे केंद्रीत कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी जाहीर केले आहे.

‘कोमसाप’कडून कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, दृकश्राव्य-कला-सिनेमा या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.

सन २०१८-१९चे वाङ्मयीन पुरस्कार या प्रमाणे आहेत : कांदबरीचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार (द्वितीय)- गोष्ट एका वळणावरची (तनुजा उल्हास ढेरे). कथासंग्रहाचा वि. सी. गर्जर स्मृती पुरस्कार (प्रथम)- ओळख (भा. ल. महाबळ). कथासंग्रहाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार (द्वितीय)- दरवळ (अरविंद हेब्बार). कविता वाड्:मय प्रकारातील आरती प्रभू स्मृती पुरस्कार (प्रथम)- घुमट (अनुजा जोशी). कविता संग्रहासाठीचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार (द्वितीय)- दगड (प्रशांत डिंगणकर). चरित्र-आत्मचरित्रासाठीचा श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार (द्वितीय)- वळख (उमाकांत वाघ). समिक्षा ग्रंथासाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार- आदिवासी लोककथा मीमांसा (डॉ. अंजली मस्करेन्हस). ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार (प्रथम)- मुक्या वेदना बोलक्या संवेदना (विनया जंगले). कादंबरीचा र. वा. दिघे स्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यंदा जाहीर केला नसल्याचे ‘कोमसाप’कडून सांगण्यात आले.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search