Next
पडघा मराठी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी
BOI
Friday, April 12, 2019 | 11:28 AM
15 0 0
Share this article:



भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद मराठी शाळेत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९२वी  जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा आहेर, कवी मिलिंद जाधव, माजी मुख्याध्यापिका साधना पाटकर, शिक्षक शाम मोराणकर, शिक्षिका कुंदा कदम, हर्षला बांगर, भाग्यश्री महाजन, सई पाटील, माधुरी पाटील, अल्पेश भोईर, सूरज भालेराव उपस्थित होते. जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महात्मा फुलें कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षण, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर स्वरचित कविता सादर करत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.



विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास नेहमीच डोळ्यासमोर ठेवावा. आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सोसल्या आहेत याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच करून द्यावी. शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाला शिक्षण हे मिळालेच पाहिजे म्हणून महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. महात्मा फुलेंनी ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या माध्यमातून शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे.’

महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे उघडली म्हणून आपण सर्व चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत असल्याचे शिक्षक मोराणकर यांनी नमूद केले. महामानवांनी कष्ट सोसले म्हणून आपण सर्व उंच भरारी घेत असल्याचे शिक्षिका कदम यांनी सांगितले.

कुंदा कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मोराणकर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search