Next
‘चेकमेट’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, February 24 | 05:42 PM
15 0 0
Share this story



पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसतर्फे आयोजित ‘चेकमेट २०१८’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन क्वीक हिल टेक्नॉलॉजीज् लि.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश काटकर यांच्या हस्ते  २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले.

या प्रसंगी ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, श्रीनिवासन रंगनाथन, प्रवीण राजपाल, ‘अल्लाना’ चे संचालक डॉ. आर. गणेसन उपस्थित होते.

‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसतर्फे डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते विनोद जैन (पुणे) आणि जी. नागराजन (बेंगळूरू) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. विनोद जैन हे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते असून, ते वृक्ष सरंक्षणासाठी कार्यरत आहेत. जी. नागराजन यांनी केलेल्या कर्नाटकमधील ग्रामीण स्त्रियांच्या सबलीकरणातील कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे,’ असे डॉ. आर. गणेसन म्हणाले.

‘चॅलेंजिंग ग्लोबल कॉम्पेटेटीव्ह लँडस्केप अँड इमर्जिंग बिझीनेस स्ट्रॅटेजिज्’ या ‘चेकमेट २०१८’ परिषदेच्या विषयावरील शोध निबंधाचे प्रकाशन या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. ही दहावी आंतरराष्ट्रीय परिषद पुणे येथील हॉटेल अरोरा टॉवर्स येथे आयोजित केली होती.

‘चेकमेट २०१८’ परिषदेमध्ये देशभरातून विविध कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. महिंद्रा स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पिलाई यांच्या उपस्थितीत नुकताच या परिषदेचा समारोप झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link