Next
‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, July 31 | 04:09 PM
15 0 0
Share this story



पुणे : आझम कॅंपस येथील पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अ‍ॅंड आर्ट्सच्या वतीने (वेदा) इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते.  

‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि अॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट स्टार कॉपीअर येथे आयोजित करण्यात आली होती. आजच्या डिजिटल प्रिंटिंग छपाईबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, माहिती होणे हा या भेटीचा प्रमुख हेतू होता,’ असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले.

‘या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कागदाचे प्रकार, विविध प्रकारची पुस्तके मुद्रित करण्याची संपूर्ण प्रक्रिया, प्रिंटिंगचे नवीन तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे, पुस्तकबांधणी, पुस्तक सरसाने चिकटविणे, पुस्तक कटिंग, लॅमिनेशन आणि फ्रेमिंग, फ्लेक्स छपाईचे तंत्र, हवामानातील बदल आणि तापमानामुळे होणारे कागदाच्या गुणवत्तेतील बदल, डिजिटल छपाईची क्रांती आदींविषयी माहिती देण्यात आली,’ असे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कागदाची मूल्ये आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा याविषयी माहिती मिळाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link