Next
सरकारसोबत काम करण्याचा अनुभव
BOI
Monday, June 05, 2017 | 01:00 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : सामाजिक विकास क्षेत्रात रस असणाऱ्या युवकांना अत्यंत उपयुक्त अनुभव देण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनाला उपयोग व्हावा हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. इच्छुक सर्वांना येत्या १५ जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळवण्यासाठी या फेलोशिप कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमामुळे मिळेल. २१ ते २६ वर्षे वयोगट, कोणत्याही शाखेची प्रथम वर्ग पदवी, एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठीचे ज्ञान या निकषात बसणारे युवक-युवती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. 

११ महिन्यांच्या या कार्यक्रमादरम्यान दरमहा ४० हजार रुपयांचे मानधन (३५ हजार रुपये विद्यावेतन + पाच हजार रुपये प्रवास व आनुषंगिक खर्च) दिले जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी तरुणांना धोरण निर्मिती, अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अशा विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अर्थपूर्ण सहभाग देता येतो. राज्यातील विविध नामांकित संस्थांना भेटी, तसेच उद्योग, कला, लेखन, पत्रकारिता, मनोरंजन आदी क्षेत्रातील नामवंतांच्या भेटींच्या संधीही या कार्यक्रमामुळे सहभागींना मिळू शकतात.

तरुणांमधील नेतृत्वगुण जोपासणे, त्यांचे प्रशासनासंदर्भातील ज्ञान वृद्धिंगत करणे, भविष्यातील नेतृत्वाच्या मोठ्या संधींसाठी युवकांना तयार करणे यासाठी या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा युवकांच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरतो आहे. व्यावसायिक वाढीची संधी हा कार्यक्रम देतो. धोरण, प्रशासन, राज्यशास्त्र, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षण वा व्यावसायिक संधी या कार्यक्रमामुळे सहज साध्य होऊ शकतात.  

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठीचे पात्रतेचे निकष आणि या योजनेचे मिळणारे फायदे या संदर्भातील संपूर्ण माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. या माहितीसाठी इथे क्लिक करा.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manoj Rane About
Proud of u....All the V best for forthcoming activity.....
0
0

Select Language
Share Link
 
Search