Next
पुस्तकात न मावणारी माणसं
प्रेस रिलीज
Tuesday, October 09, 2018 | 09:58 AM
15 0 0
Share this article:

ज्यांच्या कार्यातून इतरांना ध्येय गवसते, अशा ज्ञानसंपन्न उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख डॉ. सागर देशपांडे यांनी ‘पुस्तकात न मावणारी माणसं’मधून करून दिली आहे. लहान असताना पितृछत्र हरविल्यानंतर आईने ज्यांना घडविले व ज्यांची आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव जगभर केले त्या डॉ. रघुनाथ उर्फ रमेश माशेलकर यांचा परिचय वाचताना अभिमान वाटतो.

शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेड कसे लागले हे सांगताना आई-वडिलांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राचा चालता बोलता इतिहास असलेले डॉ. एकनाथ चिटणीस, विज्ञानाचे अध्यात्मिक वारकरी डॉ. विजय भटकर, ‘मृत्युंजय’कर शिवाजी सावंत, कवितेच्या प्रेमात रंगलेले कवी मंगेश पाडगावकर यांची वाटचाल यात आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रात टिकून राहणे, त्यात यशस्वी होण्यासाठी जनाधार मिळविणे हे ज्यांना साध्य झाले ते मधू दंडवते, रावसाहेब शिंदे व मनोहर पर्रीकर आणि डॉ. शरच्चंद्र गोखले, एकनाथ ठाकूर, सुरेश हुंदरे अशा वेगळ्या वाटेवरच्या व्यक्तींची जडणघडण यातून समजते.   

प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन
पाने : २२०
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search