Next
पंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती
पहिल्या शिवयोग कृषी शिबिराचे आयोजन
BOI
Monday, August 13, 2018 | 03:34 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
पंढरपूर येथे दोन दिवसांचे पहिले शिवयोग कृषी शिबिर ११ आणि १२ ऑगस्ट रोजी पार पडले. या शिबिरात शेतकऱ्यांना कॉस्मिक फार्मिंग या नवीन संकल्पनेची माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. 

गोवा सरकारने शिवयोग शेती पद्धतीला प्रोत्साहन दिल्यानंतर आता या शेती संकल्पनेची सगळीकडे जोरात चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर तालुक्यातही शेतकरी या पद्धतीची शेती शेतकरी करू लागले आहेत. शेतकऱ्यांना या नवीन शेती पद्धतीतील विज्ञानाची माहिती कळावी, म्हणून पंढरपूर येथील गयामाता मनमाडकर आश्रमात या निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पंढरपूर तालुक्यातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. पंढरपूर शिवयोग परिवाराच्या वतीने या शिवयोगी कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीला पूरक अशा कॉस्मिक फार्मिंग या नवीन संकल्पनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीमधील गुंतवणूक खर्च कमी होऊन उत्पादनात हमखास वाढ होण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना संजीवनी हीलिंगबद्दल माहिती देण्यात आली. या ज्ञानाचा शेतीबरोबरच शेतकऱ्यांवरही चांगला व सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या शारीरिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचे संशोधनाअंती आढळले असल्याचे आयोजकांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून याचा संपूर्ण देशात प्रसार व प्रचार चालू आहे. शिवानंद हे या संकल्पनेचे जनक असून, त्यांच्याकडून उपस्थित शेतकऱ्यांना ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून याबद्दलचे ज्ञान देण्यात आले. शिबिराला आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आपली शेती व आपला परिवार समृद्ध होण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

या शिबिराविषयी अधिक माहिती अथवा या प्रकारच्या शिबिराच्या आयोजनासाठी पंढरपूर येथील शिवयोग परिवाराचे संजीव खपाले (९९२३१ ७४७४७) आणि विनायक मुळे (९४२२६ ०८७६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेतलेले सेंद्रिय शेती पुरस्कार विजेते शेतकरी भारत रानरुई यांनी शेतीत पंचमहाभूतांच्या तत्त्वाचा वापर करत असताना त्यात आकाशतत्त्वाची ताकद वाढवण्याचे महत्त्वाचे साधन या शिवयोग कृषी शिबिरातून मिळाले असल्याचे सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About
mast va mast
0
0
Ravindra About
Jaj kisan Namha shivay
0
0
Shailaja patil About
Very helpful shivi for farmers namah shivay
0
0
Laxmikant Mankeshwar About
New way of farming. Thanks Avadhoot Baba Shivanand ji & shiv yog Pandharpur
0
0
Anil misal About
Shiv yog krushi cosmic farming very very best shiber
0
0
Arun Mali /Ropale About
Navin mahiti /mast
0
0

Select Language
Share Link
 
Search