Next
रोपळे गावातील शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपेटी उपक्रमाची सुरुवात
शिवसंदेश प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सगुणा शेडगे यांच्या पुढाकारातून सुरुवात
BOI
Saturday, June 29, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
‘समाजाला आता दानपेटीपेक्षाही ज्ञानपेटीची जास्त गरज आहे. ही ज्ञानपेटी भरण्यासाठी गावाची चांगली साथ मिळेल,’ अशी अपेक्षा रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) गावाचे सरपंच दिनकर कदम यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवसंदेश प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सगुणा शेडगे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ज्ञानपेटी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर रोपळे विकास प्रतिष्ठानचे अर्जुन भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका भोसले, उपाध्यक्ष शिवाजी बिस्किटे, ‘रयत’चे बाळासाहेब पाटील, दत्तात्रय कदम, भोसले, सतीश भोसले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष जनक भोसले, मुख्याध्यापक सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी सरपंच कदम यांनी या ज्ञानपेटीत शैक्षणिक साहित्य टाकले. या ज्ञानपेटीच्या माध्यमातून शिवसंदेश प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. शेडगे यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्य भेट दिले. ज्ञानपेटीचा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या ज्ञानपेटीत जमा झालेल्या शैक्षणिक साहित्याचा समाजातील गरजू विद्यार्थांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम आपण आता खासकरून दुष्काळी भागातील शाळांमध्ये राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search