Next
क्लिअरटॅक्स आणि झेरोधाची भागीदारी
प्रेस रिलीज
Monday, July 16, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील आघाडीची कर, वित्तसहाय्य आणि बिझनेस कम्प्लायन्स कंपनी क्लिअरटॅक्स आणि भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान-प्रेरित ब्रोकरेज कंपनी झेरोधा यांनी भागीदारी केली आहे. 

इक्विटी किंवा डेरिएटिव्ह्जच्या शेकडो व्यवहारांच्या नोंदी हाताने करणे ही अत्यंत दमवणारी प्रक्रिया आहे आणि यात चुकांची शक्यता अधिक असून, त्यामुळे दंड होण्याची शक्यताही वाढते. क्लिअरटॅक्स आणि झेरोधामधील भागीदारीचे लक्ष्य अशा समस्या टाळण्यात मदत करणे आणि कर भरणे काही क्लिक्सच्या मदतीने शक्य करणे हे आहे. वापरकर्ते एकूण उलाढाल, दीर्घकालीन लाभ, लघुकालीन लाभ, एकूण भांडवली लाभ आणि ऑडिट पात्रतेचा तपशीलवार सारांश क्लिअरटॅक्स पोर्टलवर केवळ झेरोधा पी अँड एल अहवाल अपलोड करून बघू शकतात.

 क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘एक एप्रिलपासून दीर्घकालीन भांडवली लाभांवर कर लावला गेल्याने गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. क्लिअरटॅक्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, कर भरण्याच्या तयारीचे ऑटोमेशन झाले तर ही समस्या सुटू शकते हे आमच्या लक्षात आले. झेरोधासोबत एकात्मीकरण होत असल्याने गुंतवणूकदार समुदायासाठी कराचे नियोजन व करभरणा सोपा होणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link