Next
‘मराठी खोली’मुळे होतोय शुद्ध बोलण्याचा प्रयत्न
रोपळे येथील पाटील विद्यालयाचा अनोखा उपक्रम
BOI
Wednesday, February 27, 2019 | 12:39 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : मराठी भाषा संवर्धनासाठी सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शि. बा. पाटील विद्यालयात मराठी भाषा खोलीचा एक वेगळा  उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या खोलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा शुद्ध बोलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रशालेत अनेक उपक्रम हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे मराठी भाषा संवर्धनासाठी खास मराठी खोलीच सुरू करण्यात आली आहे. प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक बी. एम. पुजारी यांनी मराठी भाषा खोलीची संकल्पना मांडली. त्याला मुख्याध्यापक एस. एम. बागल व पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील यांनी मान्यता दिली आणि साधारण तीन महिन्यांपूर्वी मराठीची खोलीची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. या खोलीतून विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी अधिक आणि विशेष माहिती मिळू लागली आहे.

मराठी आपली मातृभाषा असली, तरी ती अजूनही ती शुद्ध बोलली जात नाही. ती शुद्ध बोलली जावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या खोलीत मराठी भाषेची उद्दिष्टे, पाल्याच्या उत्तम विकासासाठी पालक म्हणून हे करू या, मराठी भाषेची रूपे, मराठी अध्यापन पद्धती, मराठी भाषेचे व्याकरण दृष्टीक्षेप, वर्गात रचनावादी पद्धतीचा वापर, मराठी भाषेसाठी मूल्यमापन तंत्रे, मराठी विषयाची संरचना या विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. याचा उपयोग विद्यार्थांना बोलीभाषेतील उच्चार शुद्ध करण्यासाठी होऊ लागला आहे. या खोलीमुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण झाली आहे.मुख्याध्यापक बागल यांनी विद्यार्थ्यांना आपली मराठी भाषा चांगली बोलता यावी म्हणून या मराठी खोली हा उपक्रम सुरू केल्याची माहिती दिली. उपक्रमशील शिक्षक बी. एम. पुजारी यांनी या उपक्रमासाठी टी. टी. ननवरे, व्ही. एस. वाडेकर, एस. पी. रोकडे, ए. एस. कंदले व एस. बी. राऊत यांचेही सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
pujari sir About 233 Days ago
atishay abhyasu lekh prasiddh kelyabaddal dhanyavad
0
0

Select Language
Share Link
 
Search