Next
‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून जलसंवर्धन मोहीम
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 04:01 PM
15 0 0
Share this story

गोदरेज कॅनमुंबई : जलसंवर्धन ही काळाची मोठी गरज बनल्याने गृहवस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने लोकांमध्ये या विषयाबद्दल जागृती करण्यासाठी ‘#MyACSavesWater’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

एअरकंडिशनरद्वारे (एसी) पाण्याची बचत करण्यामागचा उद्देश म्हणजे ‘एसी’च्या आतील भागामध्ये ‘एव्हॅपोरेटर कॉइल्स’असतात. या कॉइलवर येणारे गरम वारे थंड करण्याचे काम केले जाते. त्यामुळे कॉईलवर ‘कॉन्डेसेशन’मुळे पाण्याचे थेंब जमा होतात. जसे उन्हाळ्यात थंड पाण्याच्या ग्लासवर पाण्याचे थेंब निर्माण होतात. एखादा एसी आठ तास चालल्यास ‘कॉन्डेसेशन’मुळे १० लिटर पाणी निर्माण होते. हे पाणी घराबाहेर नेऊन ड्रेन पाईपद्वारे फेकून देण्यात येते. भारतामध्ये दरवर्षी ५० लाख एसींची विक्री होते. म्हणजेच त्यामधून बाहेर पडणाऱ्या ५ कोटी लिटर पाण्याची बचत होऊन त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. पाणीबचतीच्या या आकड्यांमध्ये सध्याच्या एसीचा विचार करण्यात आलेला नाही.

ही गोष्ट लक्षात घेऊन जलसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने गोदरेज अप्लायन्सेसद्वारे ‘#MyACSavesWater’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. आपल्या एसीमधून बाहेर पडणारे पाणी वाचविण्यासाठी सर्वसामान्य लोकांना या उपक्रमाद्वारे शिक्षित केले जाणार आहे; तसेच ‘गोदरेज’द्वारे एक हजार ग्राहकांना १० लिटर पाण्याची साठवणूक असलेले ग्रीन बॅलन्स रेंजमधील एसी पुरविण्यात आले आहेत. एसीमध्ये साठलेले पाणी ग्राहकांना घरांमधील फुलझाडांसाठी वापरता येईल, तसेच घराच्या साफसफाईसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत गरजांबद्दलच्या भारतीय स्टॅंडर्ड कोडनुसार एक व्यक्ती दररोज अंघोळ, तसेच इतर गोष्टींसाठी १२५ लिटर पाण्याचा उपयोग करते. एसी युनिटमधून निर्माण झालेल्या १० लिटर पाण्याचा वापर या व्यक्तीने या कामांसाठी केल्यास नळामधून येणाऱ्या पाण्यामध्ये आठ टक्क्यांची बचत होऊ शकते.

गोदरेज अप्लायन्सेसचे बिझीनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘ग्राहकांना चांगली जीवनशैली उपलब्ध करून देणे हे आमचे आश्वासन आहे. त्याच्या पूर्ततेसाठी कल्पक उपक्रम आणि तंत्रज्ञानाची जोड आम्ही देतो; तसेच याचवेळी आम्ही पर्यावरणालाही तितकेच महत्त्व देतो. जलसंवर्धन ही सध्या काळाची गरज असून, त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. ‘सोच के बनाया है’ या आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ‘#MyACSavesWater’ या उपक्रमाद्वारेही ग्राहकांना पाणीसमस्येबाबत जागृत करणे, तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.’

‘गोदरेज अप्लायन्सेस’च्या विपणन प्रमुख स्वाती राठी म्हणाल्या, ‘गोदरेज अप्लायन्सेसमध्ये पर्यावरणाला खूप महत्त्व दिले जाते. ग्राहकांना आम्ही जे एक हजार कॅन पुरविले आहेत, त्याद्वारे या उपक्रमाला चालना मिळेल आणि त्यातून इतरांना जलसंवर्धनाची प्रेरणा मिळेल. प्रत्येक घरातील एसीद्वारे दररोज १० लिटर पाण्याची बचत करणे शक्य आहे. हा अगदी सोपा विचार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि पर्यावरणाच्या संरक्षणाताही मोठी भूमिका निभावू शकतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link