Next
‘अगडबम’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर...
लोकप्रिय ठरलेल्या ‘नाजुका’च्या भूमिकेत तृप्ती भोईर पुन्हा सज्ज
BOI
Saturday, August 25, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

माझा अगडबम

आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या मराठी चित्रपटाने स्त्रीच्या एका आगळ्या-वेगळ्या भावविश्वाचे चित्रण केले होते. या चित्रपटातील ‘नाजुका’ या व्यक्तिरेखेने रसिक-प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असून यातून पुन्हा नाजुका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अगडबम (२०१०)२०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या अगडबम चित्रपटात अभिनेत्री तृप्ती भोईर ही नाजुकाच्या भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. तृप्ती भोईर आणि मकरंद अनासपुरे या जोडीच्या विनोदाने सगळ्यांना खळखळून हसवले होते. आता पुन्हा एकदा तृप्ती भोईर नव्याने याच नाजुकाच्या दमदार भूमिकेतून समोर येणार आहे. तृप्तीने या चित्रपटात केवळ अभिनेत्रीचीच भूमिकाच पार पाडलेली नसून ती या चित्रपटाची लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मातीही असणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट विशेष असेल. 

'माझा अगडबम' चित्रपटात तृप्तीसोबत अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे सुबोध भावेबरोबर त्याचा मुलगा कान्हाही या चित्रपटात असल्याचे सांगितले जात आहे. मुलासोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतानाचा अनुभव सुबोधसाठी खास असेल. येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search