Next
कौशल्यांच्या अभावामुळे नोकरीच्या जबाबदाऱ्यांची रचना बदलतेय
‘शाइन डॉट कॉम’चे सर्वेक्षण
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : वरिष्ठ एचआर व्यावसायिकांपैकी जवळपास ४७ टक्के व्यावसायिक देशात भविष्यात असणाऱ्या कौशल्यांच्या अभावाचा अंदाज वर्तवित आहेत. त्यामुळे हळूहळू बदलणाऱ्या प्रवाहानुसार नोकऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्याचे काम एक-तृतीयांश म्हणजे ३७ टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक करीत आहे, असे ‘शाइन डॉट कॉम’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

२०१९मधील प्रमुख एचआर ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रक्रियांना स्ट्रीमलाइन करण्यास आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवण्यास कंपन्या वेगाने तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत असल्याने नोकरीच्या पारंपरिक जबाबदाऱ्यांचे प्रचंड रूपांतर होत आहे. अधिक व्यापक कौशल्यसंचाची गरज भासणाऱ्या नोकरीच्या वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्यांचा उदय होत आहे. त्याचप्रमाणे, ज्या कंपन्यांनी पूर्वी पारंपरिक कौशल्याच्या ब्रांड मार्केटर्सना नियुक्त केले होते, त्या आता नवीन पिढीच्या संपर्क तज्ज्ञांकडे बघत आहे जे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, एसईओ, एसईएम, इन्फ्लुएंसर मार्केटिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट आणि बरेच काही हाताळू शकतात.

जॉबच्या परिदृश्यामधील कौशल्यांची मागणी अधिकाधिक तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टीकोनाकडे सरकत असताना उमेदवारांना त्यांच्या जॉबच्या अर्ज, सीव्ही आणि रिझ्युमेच्या स्वरूपांत बदल करणेही गरजेचे आहे. पारंपरिक सीव्ही एवढ्या गर्दीत उठून दिसेल अशी अपेक्षा आता करता येणार नाही. कंपन्यांना आकर्षित करण्यास वेगवेगळ्या कार्यात्मक क्षेत्रांमधील बऱ्याच कौशल्यांना एका भूमिकेत एकत्रित करणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे सर्व आवश्यक कौशल्ये असतीलच हे गरजेचे नसले, तरीसुद्धा शिकण्याची इच्छा असणे हेसुद्धा एक महत्त्वाचे कौशल्य बनत चालले आहे.

‘शाइन डॉट कॉम’चे सीईओ झैरस मास्टर म्हणाले, ‘बाजारात नोकऱ्यांच्या नवनवीन जबाबदाऱ्यांची भर पडत असताना आम्ही जॉबचे नवीन वर्णन विकसित होताना बघत आहोत. पूर्वी एखाद्या विशिष्ट नोकरीसाठी आवश्यक नसणारी कौशल्ये आता बहुआयामी प्रोफाइल बनवण्यासाठी जोडली जात आहे. त्यामुळे, पारंपरिक रिझ्युम फॉरमॅट कालबाह्य झाला आहे. उमेदवारांना त्यांच्याजवळ असलेल्या सुसंगत जॉब कौशल्यांना अधोरेखित करून रिझ्युमची अपील वाढवणे गरजेचे आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search