Next
बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी
BOI
Tuesday, November 13, 2018 | 10:06 AM
15 0 0
Share this story

बिटकॉइन म्हणजेच आभासी चलन (व्हर्च्युअल मनी) नावाची समांतर अर्थव्यवस्था जगभरात पुढे येत आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने या चलनावर बंदी घातली आहे. हे चलन कायदेशीर नाही. कोणतीही बँक त्याला तारण अथवा अन्य स्वरूपात स्वीकारत नाही, तरी बिटकॉइनबद्दल कुतूहल आहे. बिटकॉइन म्हणजे नेमके काय, त्याद्वारे व्यवहार कसे होतात, याची उत्तरे जयराज साळगावकर यांच्या ‘बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी’मधून मिळतात.

बिटकॉइन हे एक ‘डिजिटल करन्सी एक्स्चेंज’ आहे. योग्य ती गुंतवणूक करून व नियमांशी बांधिलकी पाळण्याचे वाचन देऊन कोणालाही या एक्स्चेंजचे सभासद होता येते, अशी याची प्राथमिक माहिती देऊन हे व्यवहार कसे होतात, हे यातून समजते. बिटकॉइनची उद्गाती सातोशी नाकामोटी ही व्यक्ती, बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सी ज्यावर कार्यरत आहेत त्या ब्लॉकचेन प्रणालीचे तंत्रज्ञान यात समजावून दिले आहे.    
      
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
पृष्ठे : १०३
मूल्य : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link