Next
‘एसएसबी’ पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 12:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी २१ फेब्रुवारी ते दोन मार्च २०१९ या कालावधीत ‘एसएसबी’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मुंबई शहरातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १८ फेब्रुवारीला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवर किंवा पुणे सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाइटवरील रिक्रुटमेंट टॅबला क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेक लिस्ट आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतींमध्ये प्रिंट, तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाउनलोड करून त्यांचीही दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरून आणावेत.

केंद्रामध्ये ‘एसएसबी’ कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील कोणतीही एक पात्रता आवश्यक असून, त्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (यूपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ‘एनसीसी’ सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने ‘एसएसबी’साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी ‘एसएसबी’ कॉल लेटर असावे किंवा ‘एसएसबी’साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी : प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक.
संपर्क क्रमांक : (०२५३) २४५१०३१, २४५१०३२
पुणे सैनिक कल्याण विभागाची वेबसाइट : www.mahasainik.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link