Next
एकाच वेळी १२ विद्यार्थ्यांबरोबर बुद्धिबळाचा ‘आनंद’
प्रेस रिलीज
Tuesday, December 11, 2018 | 02:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : हिंजवडी येथील एडिफाय इंटरनॅशनल स्कूलतर्फे पुणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी उपस्थिती लावली. या वेळी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या १२ विद्यार्थ्यांसोबत ते बुद्धिबळ खेळले. हा खेळ एडिफाय इंटरनॅशनल स्कूल येथे झाला.

या स्पर्धेत पाच ते १६ या वयोगटांतील ४८६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्रारंभिक फेरी नोव्हेंबर महिन्यात झाली. अंतिम १२ स्पर्धकांनमध्ये अद्वैत पाटील, कशिश जैन, शिवराज पिंगळे, जेल दिगंबर, निर्गुण केवल, प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील, सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना यांचा समावेश होता.

या वेळी बोलताना विश्वनाथन आनंद म्हणाले, ‘एडिफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थांच्या कौशल्यपूर्ण खेळाला वाव दिला जात आहे हे बघून आनंद वाटला. अभ्यासाप्रमाणे खेळालाही तेवढेच महत्त्व देणे गरजेचे आहे, तरच त्यात उत्तम यश नक्की मिळेल. प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देणे आवश्यक आहे; तसेच बुद्धिबळात आणि आयुष्यात यश व अपयश पचवण्याची ताकद निर्माण केली पाहिजे.’

शाळेच्या मुख्याधापिका प्रिया आनंद म्हणाल्या, ‘अंतिम १२ स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळण्याची खूप मोठी संधी मिळाली. यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विश्वनाथन यांच्याकडून मिळालेल्या टिप्स स्पर्धकांना आयुष्यभर नक्कीच उपयोगी पडतील हा मला विश्वास आहे.’

पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष जोसेफ डिसुझा म्हणाले, ‘स्पर्धेत सहभागी झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी होती. स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्याकडून बुद्धिबळ खेळातील विविध  टिप्स व प्रेरणा मिळाली.’

या वेळी विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते एडिफाय इंटरनॅशनल स्कूलच्या आयबी अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले; तसेच त्यांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस १० हजार रुपये, सहा हजार, चार हजार, अडीच हजारांची दोन आणि दोन हजार रुपयांची पाच बक्षिसे, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link