Next
पुण्यात मिळणारे विद्यावेतन किमान वेतनापेक्षा अधिक
‘टीमलिज स्किल युनिव्हर्सिटी स्टायपेंड प्रायमर रिपोर्ट’मधील निष्कर्ष
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 12:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी व अॅप्रेंटिसशिप अॅक्टमधील बदल हे अॅप्रेंटिसशिपसंदर्भात अनुकूल व सकारात्मक ठरत आहे, असे टीमलिज स्किल युनिव्हर्सिटी स्टायपेंड प्रायमर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या मते, पुण्यातील अॅप्रेंटिसना दिला जाणारे विद्यावेतन (स्टायपेंड) हे राज्यात लागू असणाऱ्या किमान वेतनापेक्षा १५० टक्क्यांनी अधिक आहे. केवळ पुण्यातील कंपन्याच नाही, तर महाराष्ट्रातील कॉर्पोरेट अॅप्रेंटिसना उदारहस्ते विद्यावेतन देत असल्याचे दिसून आले आहे.

किमान वेतनापेक्षा १५९ टक्के अधिक वेतन असणाऱ्या महाराष्ट्राने सर्वाधिक वेतन देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये बाजी मारली आहे. अॅप्रेंटिससाठी सर्वाधिक रक्कम देणाऱ्या क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाइल व संबंधित उद्योग (किमान वेतनापेक्षा १४४ टक्के अधिक), रिटेल (किमान वेतनापेक्षा १६९ टक्के अधिक), व आयटी/आयटीईएस (किमान वेतनापेक्षा १५३ टक्के अधिक) यांचा समावेश होता.

अहवालानुसार, शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार करता, पुण्यातील इंजिनीअरिंग व डिप्लोमाधारकांनी सर्वाधिक विद्यावेतन मिळवले. डिप्लोमाधारक अॅप्रेंटिसना किमान वेतनापेक्षा २.५ पट अधिक पैसे देण्यात आले. प्रोफाइलच्या दृष्टिकोनातून विचार करता, सेल्स एक्झिक्युटिव्ह व प्रमोटर अॅप्रेंटिसना ऑटोमोबाइल व उत्पादन क्षेत्रात लक्षणीय विद्यावेतन मिळाले. ट्रेड व टेक अॅप्रेंटिसना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक, आयटी/आयटीईएस व कन्झ्युमर गुड्स या क्षेत्रांत उच्च विद्यावेतन मिळाला. या व्यतिरिक्त, ऑपरेटर, कस्टमर सर्व्हिस असिस्टंट व मेंटेनन्स आणि क्वालिटी टेक्निशन अशा कामांसाठी नियुक्ती करण्याचे प्रमाणही पुण्यामध्ये अधिक आढळले आहे.

या विश्लेषणाविषयी टीमलीज स्किल्स युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष सुमित कुमार म्हणाले, ‘या शहरातील अॅप्रेंटिसना दिल्या जाणाऱ्या मोठ्या विद्यावेतानातून ही संकल्पना अधिकाधिक स्वीकारली जात असल्याचे स्पष्ट होते. या संकल्पनेचा वाढता स्वीकार आणि सरकारने हाती घेतलेले योग्य उपक्रम, यामुळे कॉर्पोरेटचा सहभाग आणखी वाढवला जाईल, यामध्ये सहभागी होण्याबाबत मनुष्यबळामध्येही त्यामुळे आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास आहे.’

राष्ट्रीय स्तरावरही, अॅप्रेंटिसना दिले जाणारे विद्यावेतन हे किमान वेतनापेक्षा अधिक आहेत. बहुतेकशा क्षेत्रांत व शहरांत, मध्यम विद्यावेतनही लागू असणाऱ्या किमान वेतनापेक्षा अंदाजे ४१ टक्के अधिक आहे. पाहणीमध्ये आढळल्यानुसार, अदर एम्प्लॉएबिलिटी स्कीम्सअंतर्गत (ओईईएस, त्यामध्ये नॅशनल एम्प्लॉएबिलिटी थ्रु अॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅमचा समावेश) असणाऱ्या अॅप्रेंटिसनाही अॅप्रेंटिसशिप अॅक्टअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनापेक्षा अधिक (७.६६ टक्के अधिक) विद्यावेतन मिळाले.

या अहवालामध्ये, मोठ्या उद्योगांकडून दिले जाणारे विद्यावेतन विरुद्ध मध्यम व लहान उद्योगांकडून दिले जाणारे विद्यावेतन यांचे तुलनात्मक विश्लेषणही केले आहे. मोठ्या उद्योगांनी इतरांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात (१२ ते ३४ टक्के) अधिक विद्यावेतन दिले. मध्यम व लहान उद्योगांनी दिलेल्या विद्यावेतनात फार फरक नव्हता. या अहवालाच्या निमित्ताने कामगारांच्या कौशल्यांबद्दलच्या अपेक्षाही समोर आल्या. कामगारांना अर्जदारांमध्ये अपेक्षित असणाऱ्या कौशल्यांमध्ये समाविष्ट असणारी आयटी, फायनान्स व अकाउंटिंग, उत्पादन व निर्मिती अशा विशेष डोमेनमधील विश्लेषणात्मक कौशल्ये, डोमेनबद्दल माहिती, गुणात्मक क्षमता ही काही कौशल्ये होती. डोमेनमधील कौशल्यांबरोबरच, कामगारांनी जेनरिक आणि प्रशासन, एचआर, सेल्स व मार्केटिंग अशा सपोर्ट फंक्शन डोमेनमधील सॉफ्ट स्किल्स व फंक्शनल स्किल्स याकडे लक्ष दिले.

स्टायपेंड प्राइमर हे अॅप्रेंटिसना क्षेत्र, प्रदेश, शैक्षणिक पात्रता व पदभार यानुसार दिल्या जाणाऱ्या रकमेशी संबंधित सविस्तर विश्लेषण आहे. नऊ शहरांतील नऊ क्षेत्रांमध्ये कार्यरत अॅप्रेंटिसचा समावेश सर्वेक्षणात केला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search