Next
वाचनातून महामानवाला आदरांजली अर्पण
प्रेस रिलीज
Wednesday, April 18, 2018 | 11:55 AM
15 0 0
Share this article:पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त लीड मिडियातर्फे आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदे मातरम संघटना यांच्या सहकार्याने ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही, तर वाचून साजरी करूया’ या अभिनव उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनातून यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

आपटे रस्त्यावरील सुशील बंगला येथे कलाकार, साहित्यिक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी यांनी डॉ. आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊन पुस्तकांचे वाचन करत आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी लीड मीडियाचे विनोद सातव, वंदे मातरमचे वैभव वाघ, अभिनेते प्रवीण तरडे, पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, अॅड. रमेश परदेशी, केदार वांजपे, योगेश नांदुरकर, दीपक रेगे, मकरंद टिल्लू, सचिन जामगे, अनघा फाटक, शिरीष मोहिते, पीयूष शहा, अरुण पटवर्धन, मनीषा पाटील, मिलिंद वेर्लेकर, किशोर वाघमारे, प्रदीप दिसले, डॉ. सायली कुलकर्णी, देवेंद्र गायकवाड, चेतन चावडा, अश्विनी तेरणीकर, मंदार आडकर, कुशल कोंडे, भूपाल पंडित आदी उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना लीड मिडियाचे सातव म्हणाले, ‘आपल्या महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे साजऱ्या होत असतात, हल्ली डीजे, फ्लेक्स लावून, रस्त्यावर धांगडधिंगा घालून, प्रदूषण करून या जयंत्या साजऱ्या होत आहेत. त्याऐवजी विधायक उपक्रमातून त्यांचे विचार जागवूया ही खरी आदरांजली ठरेल म्हणून ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही, तर वाचून साजरी करूया’ हा उपक्रम आम्ही हाती घेतला.’

वाघ म्हणाले, ‘आपल्याकडे महापुरुषांची विविध रंगात विभागणी झाली आहे, ते सर्व तिरंग्यावर असायला हवेत यासाठी हा उपक्रम आम्ही राबविला. या निमित्ताने पहिल्यांदाच सदाशिव, शनिवार, नारायण पेठेत आणि आपटे रस्त्यावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी झाली आहे.’

अभिनेते तरडे म्हणाले, ‘आज आपटे रस्त्यावर ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही, तर वाचून साजरी करूया’  हा कार्यक्रम होत आहे. पुढील वर्षी हा उपक्रम जनता वसाहत, दांडेकर पुल भागात हा उपक्रम राबवूया यामधून एक डीजे कमी झाला, चार लोक रस्त्यावर नाचण्यापेक्षा वाचनाकडे वळले, तरी ती खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांना आदरांजली ठरेल.’

पुणे नाट्य परिषेचे अध्यक्ष देशमुख यांनी आभार मानले. या उपक्रमात  वदे मातरम् संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा पुणे, सेवादल परिवार, एकपात्री कलाकार परिषद, रसिक साहित्य आदी संस्थांनी सहभाग घेतला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search