Next
समतानगर मराठी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात
मिलिंद जाधव
Thursday, August 16 | 02:01 PM
15 0 0
Share this story



भिवंडी :
 ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील समतानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा दोंदे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. माजी मुख्याध्यापक कृष्णा चव्हाण, महेश केदार, अशोक कशिवले, मारुती कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कवी मिलिंद जाधव यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कविता सादर केली. ज्या शूरवीरांनी, महापुरुषांनी देशासाठी आहुती दिली, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.

महेश केदार, सचिन दोंदे, अभय दोंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता सामाजिक बांधिलकी जपून वह्यावाटप केले. तर शाळेचे माजी विद्यार्थी महेश थोरात यांनी शाळेला कपाट भेट म्हणून दिले. या वेळी निवृत्त ग्रामसेवक रघुनाथ जाधव, रमेश जाधव, हरिदास भोईर, उमाकांत दोंदे, विनोद प. जाधव, वसंत जाधव, स्वप्नील सोष्टे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्षा रोहिणी दोंदे, कल्पेश दोंदे, अंगणवाडी शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गिरी यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी केले. 

पडघा, विद्यानगर येथे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ओमकार मेडिकलच्या सौजन्याने हेमंत पाडेकर यांच्या हस्ते वह्या आणि पेनांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला होता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link