Next
पुणे ‘आयसीएआय’च्या अध्यक्षपदी जाखोटिया
प्रेस रिलीज
Wednesday, March 07 | 12:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : सीए इंटरमिजीएटचे ऑल इंडिया रँकर, महेश प्रोफेशनल फॉरम आणि विदर्भ महेश असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले सीए आनंद जाखोटिया यांची आयसीएआयच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

अध्यक्षपदाचा कार्यभार घेण्यापूर्वी त्यांनी कोषाध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. विकासाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी यापूर्वी सांभाळला आहे, जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करते. जाखोटिया यांच्या कार्यकाळात विकासाच्या पुणे शाखेने २०१५-२०१६ मध्ये ‘बेस्ट ब्रांच इन दी रिजन’ आणि ‘बेस्ट ब्रांच इन दी नेशन‘ हे अॅवॉर्ड प्राप्त केले होते. जाखोटिया हे एमव्हीपीएम, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या महेश विद्यालय कोथरूडच्या मॅनेजिंग कमिटीतदेखील आहेत.

जाखोटिया यांच्याप्रमाणेच सीए ऋता चितळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून, सीए राजेश अग्रवाल हे सचिव आणि विकासाचे अध्यक्ष म्हणून तर सीए अभिषेक धामणे यांची आयसीएआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांना अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचे असलेले ग्रंथालय आणि अभ्यासिकांची सोय आयसीएआयचे नवे अध्यक्ष करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील ते करणार आहेत. सदस्यांसाठी ‘सीपीई’ आणि ‘नॉन-सीपीई’ कार्यक्रमांचे अगदी वाजवी किंमतीत आयोजन करण्याची त्यांची इच्छा आहे. सदस्यांसाठी नेहमीच्या ट्रेनिंग कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा अजेंडा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link