Next
‘कल्याण’तर्फे रमजान ईदीसाठी विशेष ज्वेलरी
प्रेस रिलीज
Monday, June 11, 2018 | 05:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येत्या रमजान ईदचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘कल्याण ज्वेलर्स’ने सहा विशेष ज्वेलरी ग्राहकांसाठी सादर केल्या आहेत. या कलेक्शनमुळे नातेवाईक, मित्रमंडळींकडील इफ्तार पार्टीचे निमंत्रण, तसेच ईद भोजनावळीसाठी जाताना तुमचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.

या ज्वेलरीचे डिझाइन सणासुदीचा काळ लक्षात घेऊन बनविलेले असून, सोने आणि स्टोन्समुळे विशेष खुलले आहे. त्यामुळे तुमची ‘स्टाईल स्टेटमेंट’ तुमच्या मित्रपरिवाराला अनुभवायला येईल. ईदीच्या वार्डरोबमध्ये या दागिन्यांचा समावेश करा. त्यातील सोन्याची चकाकी आणि खड्यांमधील प्रकाश, तेज तुमच्या डोळ्यांमध्येही दिसून येईल.

ईदीसाठी तुम्ही बनविलेल्या तुमच्या आऊटफिटचे सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी नेकलेसचा उपयोग होईल. सोने आणि आकाशी मण्यांपासून हा नेकलेस तयार करण्यात आला आहे.

जगभरातील ऐतिहासिक मशिदींमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्यदिव्य अशा झुंबरांचा हा मॉडर्न अवतार म्हणजे झुमके. सोने, हिरे आणि माणकांपासून बनविलेले हे झुमके तुमचे सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी हातभार लावतील. ​

नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टीने तुम्हाला नवाबी थाट हवा असेल, तर तुम्ही हे डिझाइन निवडायलाच हवे. मोती, हिरव्या रंगाचे पोलका खडे हे तुम्ही परिधान केलेल्या दागिन्यांमधून तुमचे औदार्य प्रतिबिंबीत करतील.

हे अत्यंत स्टायलिश मानले जाणारे सुवर्ण ब्रेसलेट आहे. तुर्कीश रत्नखड्यांनी ते सजविण्यात आले आहे. त्याच्या कडा रोडियमच्या असून, त्याचा अनुभव हिऱ्यांसारखा येतो. क्लासिक, मॉडर्न स्टाइलचे हे ब्रेसलेट आहे. या ईदीसाठी ज्यांना ‘स्टाईल स्टेटमेंट’ करायचे आहे, त्यांच्यासाठी हा दागिना अगदी परफेक्ट आहे. ​

डोळ्यांना दीपवणारा हा दागिना सोने आणि हिऱ्यांच्या कारागिरीतून घडविण्यात आला आहे. ही रिंग तुम्ही परिधान केली की तिच्या स्टाइलमुळे सगळ्यांची नजर तुमच्यावर खिळेल. ​
 
काही व्यक्ती अशा असतात की त्यांना सणदेखील साधेपणानेच साजरा करायला आवडते. स्वारोवस्की हिऱ्यांपासून बनविण्यात आलेले हे सुवर्णपेंडंट अशा व्यक्तींसाठी अगदी योग्य आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link