Next
‘कोकणातील शेतकऱ्यांना मिरी निर्यातीची चांगली संधी’
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मधील परिसंवादाचा सूर
प्रेस रिलीज
Monday, November 05, 2018 | 01:51 PM
15 0 0
Share this story

ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमधील परिसंवादात डावीकडून विजय जोगळेकर, प्रभाकर सावे, मिलिंद प्रभू, भास्कर पाटील, पी. कोळेकर.

पुणे : ‘जगात फक्त पाच देशांत काळी मिरीचे उत्पादन होत असल्याने कोकणवासीयांना काळी मिरी लागवडीतून निर्यातीची चांगली संधी आहे त्यातून कोकणातील शेतकऱ्याला आर्थिक समृद्धी मिळवता येईल,’ असा सूर ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमधील परिसंवादात उमटला.  

कोकण भूमी प्रतिष्ठान आणि एक्झिकॉन ग्रुप यांच्या वतीने मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर येथे ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे या अंतर्गत ‘आधुनिक शेती; कोकणचे वैभव’ या हा परिसंवाद झाला. फलोत्पादन तज्ज्ञ विजय जोगळेकर, कृषी तज्ज्ञ प्रभाकर सावे, मसाला पिकांचे तज्ज्ञ मिलिंद प्रभू, कृषी-पणन मंडळाचे अधिकारी भास्कर पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीतील कृषी तज्ज्ञ पी. कोळेकर यांनी या परिसंवादात भाग घेतला.

मसाला पीक तज्ज्ञ प्रभू म्हणाले, ‘काळी मिरी जितकी पिकवू तितकी विकली जाते. कोकणात फार्मा कंपन्या त्या विकत घेतात आणि निर्यात करतात. काजू आणि काळी मिरी एकत्र घेतली, तर दुप्पट फायदा होतो.’

‘शेती पाहणे हाही पर्यटनाचा विषय झाल्याने पर्यटकांना शेती कशी होत असते, हे पाहण्याचे कुतूहल असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास कृषी आणि पर्यटन विषयक असे दोन्ही प्रकारचे लाभ होऊ शकतात,’ असे मत प्रभाकर सावे यांनी व्यक्त केले .

जोगळेकर म्हणाले, ‘वनस्पती शास्त्राची ओळख असेल, तर फळबागायतीमधून चांगला फायदा होतो. या शास्त्राची जाण वाढवणे आवश्यक आहे. फलोत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धती महत्त्वाची असून, सिंचनाचा विचार करताना पाणी बचतीपेक्षा अन्नद्रव्ये मुळाशी शंभर टक्के पोचतील यावर भर द्यावा.’

ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचे संयोजक संजय यादवराव, एम. क्यू. सय्यद, किशोर धारिया यांनी स्वागत केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link