Next
‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात
प्रेस रिलीज
Wednesday, May 09 | 04:20 PM
15 0 0
Share this storyमुंबई : मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही सर्वोत्कृष्ट, तर ‘विठूमाऊली’ लक्षवेधी मालिका ठरली. स्टार प्रवाहच्या इतर मालिकांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावले.

अर्चना नेवरेकर फाउंडेशनतर्फे दरवर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या रंगारंग सोहळ्यात कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स सादर केले. सई देवधरची ठसकेबाज लावणी आणि गश्मीर महाजनीच्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची मन जिंकली. मानसी नाईकच्या ‘घुमर’ने उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रूपल नंद, समीर परांजपे, ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, एकता लब्दे, सायली देवधर आणि विकास पाटील यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत आणखी वाढली.

‘नकळत सारे घडले’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर) असे पुरस्कार पटकावले. दमदार परफॉर्मन्सेस असलेला हा रंगारंग सोहळा लवकरच ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link