Next
प्रेमाची किंमत काय?
BOI
Friday, May 11 | 10:05 AM
15 0 0
Share this story

नागपूरवरून पुण्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेला नायक आणि पाली इथे जन्मलेली, नारायणमळीसारख्या खेड्यात राहिलेली, शिक्षणासाठी पुण्यात आलेली नायिका. आयुष्यात काही चांगले शिकण्याची, मोठे होण्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन दोघेजण पुण्यात येतात. कुठल्याशा निमित्ताने भेटतात नि प्रेमात पडतात. समोर आलेल्या आव्हानांना तोंड देत प्रेम निभावतात आणि आयुष्यही घडवतात. या दोघांची कहाणी मंदार कारंजकर आणि दाक्षायणी आठल्ये यांनी एकत्रितरित्या लिहिली आहे.

एक प्रकरण मंदार यांनी, तर दुसरे प्रकरण दाक्षायणी यांनी लिहून एक अभिनव प्रयोगच केला आहे. ‘फेसबुक आणि ट्विटरच्या क्षणभंगुर नातेसंबंधांच्या युगातील ही प्रेमकथा म्हणजे प्रेम महत्त्वाचे की शिक्षण? पदव्या आणि पैसा महत्त्वाचा की प्रियकराची साथ? आई-वडिलांचे ऐकायचे की मनाचे?’ यांसारख्या प्रश्नांचा शोध या कादंबरीत घेतला आहे.

प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : २६८
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link