Next
‘एसआरओ’ उभारण्याची ‘बीसीएफआय’ची शिफारस
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस कॉरस्पाँडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया या कॉर्पोरेट बिझनेस कॉरस्पाँडन्ट्स आणि एजंट बिझनेस कॉरस्पाँडन्ट्सच्या राष्ट्रीय संघटनेची नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली आरबीआय-शासित समितीसोबत बैठक झाली. यामध्ये कोणत्या प्रकारे आर्थिक समावेश अधिक चांगल्याप्रकारे आणि जलद साधता येईल यावर चर्चा झाली. ‘बीसीएफआय’ने केलेल्या शिफारसींमध्ये बीसी चॅनल व्यावहारिक बनवण्यासाठी ‘एसआरओ’च्या उभारणीची आणि प्रायसिंग फ्रेमवर्कचे पुनरावलोकन करण्यासाठी समितीच्या मदतीची मागणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे महत्त्वाच्या शिफारशींमध्ये एकाच एजंटला अनेक बँकांमधील अनेक उत्पादने सादर करण्याची परवानगी दिली जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जेणेकरून ग्राहकांना मिळणाऱ्या ऑफरिंगमध्ये आणि पर्यायांमध्ये नाविन्य असेल. शिवाय बिझनेस कॉरस्पाँडन्ट्स आणि फिनटेक फर्म्ससाठी एक रेटिंग प्रणाली तयार करण्याच्या मुद्द्यावरदेखील चर्चा करण्यात आली.

‘बीसीएफआय’ने डिजिटल पेमेंट्स वाढवण्यासाठी समितीसमक्ष दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बिझनेस कॉरस्पाँडन्ट्स एजंट आउटलेट एजंट्सना अनेक बँकांची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याची अनुमती देण्याचे सुचविले. जेणे करून ऑनलाइन खरेदीप्रमाणे ग्राहकांकडे विभिन्न पेमेंट प्रकार आणि पेमेंट गेटवेंचा उपयोग करण्याचा विकल्प असेल. एखाद्या प्रायोजक बँकेचा सर्व्हर, कनेक्टिव्हिटी काही कारणाने डाउन असेल किंवा प्रायोजक बँक मायक्रो-डिपॉजिट वाढविण्यास किंवा कमी तिकीट लोन प्रस्तुत करण्यास तयार नसेल, तर सामान्य ग्राहकाला फायद्यांपासून वंचित ठेवणे योग्य नाही.

या विषयी बोलताना ‘बीसीएफआय’च्या कम्युनिकेशन्स समितीचे अध्यक्ष आनंदकुमार बजाज म्हणाले, ‘आम्ही समितीला सांगितले आहे की, त्यांनी बिझनेस कॉरस्पाँडन्ट्सना मल्टी-बँक प्रॉडक्ट व सेवा देण्यासाठी सक्षम बनवण्यावर विचार करावा. यामुळे पेमेंट आणि रेमिटन्स सेवा प्रदाते देशभरात मोठ्या बिन-डिजिटल ग्राहक बेससाठी आणखी नवीन उत्पादने बनवण्यासाठी सक्षम होतील. शिवाय अशा प्रकारच्या सुविधेमुळे एखाद्या बँकेत काही तांत्रिक अडचण निर्माण झाली असेल किंवा प्रक्रियेत विलंब होत असला, तरी उपभोक्ते अनेक बँक सेवा प्रदात्यांकडून मिळणाऱ्या नानाविध सेवांपर्यंत वेळेवर पोहोचू शकतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search