Next
इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांची ससूनला भेट
प्रेस रिलीज
Thursday, July 05, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this story

इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांनी ससूनमधील नवजात शिशु विभागाला भेट दिली. त्या वेळी  प्रकाश छाब्रिया, डॉ. अजय चंदनवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे : ‘देशासाठी नवनिर्माणाचे स्वप्न पाहणाऱ्या या लहानग्यांवर उपचार करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले काम पाहून मी प्रभावित झालो आहे. आयुष्यातील पहिल्या आव्हानावर मात करण्यासाठी या चिमुकल्यांना बळ देण्याचे काम या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने केले आहे. छाब्रिया कुटुंबाने घेतलेल्या जीवदानाच्या या मिशनमधील पुढाकाराचे कौतुक आहे. यापुढेही काम असेच सुरु राहावे’, असे प्रतिपादन इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ससून सर्वोपचार रुग्णालयात उभारलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला डॅनियल कार्मन व सहकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली. या विभागातील सुसज्ज सुविधा, स्वच्छता आणि प्रशिक्षित डॉक्टर-नर्सेसची टीम पाहून डॅनियल कार्मन यांनी आनंद व्यक्त केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालयाच्या सुधारणेसाठी सुरु असलेल्या इतर कामाचीही पाहणी या वेळी डॅनियल कार्मन यांनी केली. ससूनमधील सुविधांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या वेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. आरती कानिटकर, डॉ. राजेश कुलकर्णी,  डॉ. उदय राजपूत आणि डॉ. इब्राहिम अन्सारी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे एप्रिल २०१७ पासून ५९ खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता केंद्र सुरु करण्यात आले आहे. नवजात बालकांना जीवदान देण्यासाठी या केंद्राचा मोठा लाभ होत आहे. पुण्यासह आसपासच्या परिसरातून येणाऱ्या बालरूग्णांवर येथे मोफत उपचार केले जातात. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link