Next
नात्यांचा रिचार्ज
BOI
Friday, February 01, 2019 | 10:19 AM
15 0 0
Share this story

बदलत्या युगात नात्यांमधील संवाद हरविल्यासारखा वाटतो; मात्र नात्यांमधील गोडवा कायम ठेवत त्याचे बंध किती घट्ट असतात, हे साईनाथ सुरेश टांककर यांनी ‘नात्यांचा रिचार्ज’मधील दहा कथांमधून दाखवून दिले आहे.

विवेक व सोनलची निखळ मैत्री असते. भावी नवऱ्यालाही या दोघांमधील शुद्ध मैत्रीची जाणीव होते आणि तो सोनलला होकार देतो. तेव्हा विवेकच्या डोळ्यांच्या कडा मात्र ओलावतात हे ‘मैत्रीण’मधून दिसते. ‘फॉरेनची नवरी’मध्ये प्रशांतचा मुलगा सोहम इंग्लंडहून येताना अॅनीला घेऊन येतो. त्याला तिच्याशी लग्न करायचे असते. मुलाच्या या सप्राइझच्या धक्क्यातून प्रशांत सावरला, तरी पत्नी भक्तीला ही गोष्ट कशी सांगायची, या विचारात तो अॅनीला त्याचा मित्र विश्वासाच्या घरी सोडतो. अखेर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशांत भक्तीला विश्वासात घेतो. ती अॅनीच्या रूपात फॉरेनच्या नवरीला आनंदाने स्वीकारते. ‘लव्ह मॅरेज’मधील रेवती-गणेश यांच्या लग्नाची कथा, उशिरा लग्न झालेल्या दांपत्याचा मूळ होऊ देण्याचा निर्णय व सासू-सुनेचे नाते ‘वंशवेल’मधून उलगडले आहे.

पुस्तक : नात्यांचा रिचार्ज
लेखक : साईनाथ टांककर
प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन
पाने : १६७
किंमत : २७० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link