Next
सुंदर साजिरा श्रावण आला
BOI
Tuesday, July 25, 2017 | 12:45 AM
15 0 0
Share this article:

फोटो : अनिकेत कोनकर

‘कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता’मध्ये आज कुसुमाग्रजांची कविता...
...............
हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला

तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला

लपत छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला

- कुसुमाग्रज

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijayalaxmi About 17 Days ago
अप्रतिम फोटोग्राफी
1
0
Godbole Shridhar About 17 Days ago
Best Song
1
0
AMOL AGAVEKAR About 17 Days ago
हे गाणं इथं जोडल्यामुळे कवितेचा श्राव्य आनंद मिळाला. अनेकानेक धन्यवाद.
1
0

Select Language
Share Link
 
Search