Next
परिवर्तन तुमच्याच हाती...
BOI
Monday, March 18, 2019 | 10:34 AM
15 0 0
Share this article:

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी अजूनही गरिबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेतच. अशा स्थितीत पिडीत, मागासलेला समाज सुधारावा व प्रचलित व्यवस्थेपासून देशाची मुक्तता व्हावी, या हेतूने इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती...’ या पुस्तकात विचार व्यक्त केले आहेत. जगातील दोन मोठे लोकशाही देश असताना भारत व अमेरिका यांच्यात एवढी तफावत का, याचे विश्लेषण केले आहे.

प्राचीन भारत व ब्रिटीशकालीन भारताची तुलना करताना भारताने जपलेली नितीमत्ता, प्रामाणिकपणा इमानदारी व कधीही हार न जाणारी वृत्ती, ब्रिटीशांची गुलामगिरी व स्वातंत्र्याची पहाट हा इतिहास दिला आहे. भारत स्वतंत्र झाला, तरी सत्तालोलुप नेत्यांनी जनतेच्या अडाणीपणाचा फायदा निवडणुकांसाठी घेतला, असे लेखक सांगतात. त्या वेळेपासून देशाला लागलेली महागाई, भ्रष्टाचार व काळ्या धनाची कीड यावर विचार व्यक्त केले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोडी यांना देशाची दुर्दशा सावरण्याची संधी जनेतेने दिली, असे सांगता त्यांच्या काळातील चांगल्या-वाईट निर्णयांची चर्चाही केली आहे.

पुस्तक : परिवर्तन तुमच्याच हाती...
लेखक : देवेंद्रसिंग वधवा
प्रकाशक : क्रीएटिव्ह कम्युनिकेशन्स
पाने : २५०
किंमत : २१९ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 116 Days ago
Poverty Is ' relative ". In America , there are ' poor ' millioneres ! A society without problems does not exist . We must keep trying to solve them .
0
0

Select Language
Share Link
 
Search