Next
‘टाटा मोटर्स’चा ‘वाइस ट्रॅव्हल’शी पुण्यात सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this article:



पुणे : टिगोर इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) पुण्यात पुरवठा करण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने वाइस ट्रॅव्हल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (WTi) सोबत करार केला आहे. बीटूबी ग्राहकांना सेवा देणारी पीपल ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनमधील डब्‍ल्‍यूटीआयही एक सर्वांत मोठी आणि वेगाने वाढणारी कंपनी आहे. ग्राहकांना सेवा देतानाच शाश्वततेला बळकटी देण्याच्या आपल्या बांधिलकीला जपत ही कंपनी पुण्यातील आपल्‍या वाहन ताफ्यात टिगोर ईव्हीचा भरणा करणार आहे. पुण्यातील बाणेर येथील काँक्रोड मोटर्स येथे टाटा मोटर्सच्या टीमने वाइस ट्रॅव्हल इंडियाच्या अधिकाऱ्यांना टिगोर ईव्हीचा पहिला ताफा हस्तांतरित केला.

या प्रसंगी बोलताना ‘टाटा मोटर्स’मधील व्‍हेइकल बिझनेस युनिटचे सेल्‍स, मार्केटिंग अँड कस्‍टमर केअर, इलेक्ट्रिक हेड अशेष धार म्हणाले, ‘आम्‍हाला पुण्‍यात धावणाऱ्या ‘डब्‍ल्‍यूटीआय’ कॅब्‍सच्‍या ताफ्यात शून्य उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा समावेश करण्‍याच्‍या पुरोगामी उपक्रमात त्यांची साथ देताना आनंद होत आहे. आम्‍हाला खात्री आहे की, पुणेकर ड्रायव्हिंग अनुभवाची प्रशंसा करतील आणि याचा आनंद घेतील. टाटा मोटर्स ग्राहकांसाठी ग्रीन मोबिलिटी उपाय सादर करण्‍याच्‍या दिशेने काम करणे सुरूच ठेवेल.’



देशभरात इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यात टाटा मोटर्स सक्रिय भूमिका बजावत आहे. भारतासाठी एका शाश्वत भविष्याची उभारणी करण्यासाठी ही कंपनी विविध भागीदाऱ्यांच्या माध्यमातून विविध इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या पर्यायांवर काम करत आहे.

या वेळी ‘वाइस ट्रॅव्‍हल इंडिया’चे सीईओ अशोक वशिष्ठ म्हणाले, ‘सार्वजनिक दळणवळणाचे विविध पर्याय आणि अशा सेवांकडून ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षा समजून घेण्याची आम्हाला मिळालेली संधी यावर आमचा व्यवसाय उभा आहे. जागतिक दर्जाची सेवा देऊन आमच्या ग्राहकांची उद्दिष्टे पूर्ण करण्यास आम्ही बांधिल आहोत. शून्य उत्सर्जन आणि ‘ईव्ही’च्या देखभालींसाठी येणारा अत्यल्प खर्च यामुळे ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना आर्थिक व शाश्वत स्वरूपात पूर्ण करणे आम्हाला शक्य होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search