Next
पुणे येथे ‘हस्‍तशिल्‍पी सिल्‍क २०१८’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, November 16 | 11:16 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हस्तशिल्‍पी’तर्फे ‘हस्‍तशिल्‍पी सिल्‍क २०१८’ या तेरा दिवसीय कपड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन १४ ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कर्वे रोड येथील सोनल हॉलमध्ये करण्यात आले आहे.

या विषयी माहिती देताना ‘हस्‍तशिल्‍पी’चे आयोजक टी. अभिनंद म्हणाले, ‘विणकरांनी विणलेल्‍या, हातमागावरील आणि सिल्‍क सहकारी सोसायट्यांनी आपली रेशीम साड्यांची विविध उत्‍पादने या प्रदर्शनात प्रदर्शित केली आहेत.  कोणत्‍याही मध्यस्‍थाशिवाय विणकर आणि कारागिर यांना थेट ग्राहकाशी संपर्क साधता यावा हा संस्‍थेचा या आयोजनामागील उद्देश आहे.’

अरिणी सिल्क साड्या, क्रेप व जॉर्जेट सिल्‍क साड्या, शिफॉन सिल्‍क साड्या, टसर सिल्‍क साड्या आणि सूट, कांजीवरम सिल्‍क साड्या आणि वेडिंग साड्या, डिझायनर फॅन्सी साड्या, धर्मावरम सिल्क साड्या, कच्चे रेशीम आणि टसर, ज्यूट सिल्क साड्या, ढाका सिल्‍क साड्या, हातमाग सिल्‍क कॉटन साड्या, सिल्क ब्‍लेंड साड्या आणि स्टोल, सिल्क शाली, उप्पडा, गढवाल, पैठणी साड्या, मंगलागिरी आणि पोचमपल्ली सिल्क साड्या आणि देशातील इतर अनेक उत्‍पादने या सिल्‍क प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.



हँड ब्‍लॉक प्रिंट साड्या, सूट आणि रेशमी बेड कव्हर्स, डिझायनर ड्रेस मटेरिअल आणि बॉर्डर, लेसेस्‌, कुर्ते, हाती विणलेले मटका आणि आसाम मुगा कापड, अपूर्व सिल्क साड्या, बलूचरी, ढाका मस्ली, गीचा साड्या, बुटिक साड्या, कांथा साड्या, झोरडोशी, लखनवी चिकन वर्क साड्या, भागलपुर सूट, प्रिंटेड सिल्क साड्या, बनारसी साड्या, रेशमी साध्या आणि बुट्टेवाल्‍या साड्या, माहेश्वरी, चंदेरी सिल्क साड्या आणि कोटा रेशीम, मलबेरी सिल्‍क विथ टेंपल बॉर्डर, बनारस जामदानी, हाती विणलेल्या साड्या अशी अनेक रेशीम उत्पादने या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
१४ ते २६ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजता
स्थळ : सोनल हॉल, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळेजवळ, पुणे
संपर्क : ८५५३४ १६९२९, ८९७१७ ५७६०६

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link