Next
साकडबावमध्ये ‘ध्येयाचा प्रवास’ काव्यसंमेलन
मिलिंद जाधव
Monday, December 24, 2018 | 03:46 PM
15 0 0
Share this article:शहापूर :
कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची कास जपण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील साकडबाव येथे निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ध्येयाचा ध्यास काव्यमंचातर्फे ‘ध्येयाचा प्रवास’ कार्यक्रमांतर्गत दिनेश ननोरे यांनी हे काव्यसंमेलन आयोजित केले होते.

‘विचारांची पिढी घडवू या, लेखणीसोबत जगू या’ या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, ध्येयाचा ध्यास काव्यमंच संचालिका सविता ननोरे, नैनेश तांबे, भगवान विशे, दिनेश ननोरे, मनाली माळी, संतोष मोहिते, पूनम पंड्या, विजय धानके, ऋता खापर्डे यांनी स्वरचित दर्जेदार कविता विद्यार्थ्यांसमोर सादर करून काव्यसंमेलनात रंगत आणली. शाळेचे आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या वेळी स्वरचित कविता सादर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या वेळी मुख्याध्याक प्रकाश सीताराम कोर यांनी सर्व निमंत्रित कवींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता पडवळ यांनी केले. आभारप्रदर्शन शिक्षक दिनेश बा. सुरोशी यांनी केले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shailesh Suvarna About 172 Days ago
Excellent . Keep it up Dinesh Sir
0
0
बबन धुमाळ, आलेगाव.ता.दौंड जि पुणे About 173 Days ago
मुलांवर कवितेचे संस्कार व्हावेत म्हणून आपण हा जो ध्येयाचा प्रवास सुरू केला आहे त्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा. सर्व कवींचे व कवयित्रींचे मनस्वी अभिनंदन.
0
0
कल्पना About 173 Days ago
शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search