Next
प्राथमिक शिक्षक संघटनेच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सचिन कळसे
नागेश शिंदे
Wednesday, August 14, 2019 | 06:23 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सचिन एकनाथराव कळसे यांची निवड करण्यात आली. सहसरचिटणीसपदी अच्युत खानसोळे, कार्याध्यक्षपदी सुमेन पोपुलवार, कोषाध्यक्षपदी महाविष्णू नाईकवाडे, सल्लागार म्हणून विश्वनाथ खिराडे, एस. डी. टेकाले आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून पांडुरंग कोकुलवार यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या हिमायतनगर तालुका कार्यकारिणीसंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष देविदास बस्वदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटक चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांची उपस्थिती होती. 

जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद राठोड, उपाध्यक्ष धात्रक, विजय पल्लेवाड, संतोष कदम, पांडुरंग पाटील, चव्हाण, राजकुमार दिग्रसकर, भि. शि. केंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष मुल्ला, उपाध्यक्ष एस. बी. इंगळे, एस. एस. राठोड, अनिल कटके, कोंडेकर व बेतेवार, दिगंबर माने, मुंडे आदींसह अनेक शिक्षक व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search