Next
‘जेट एअरवेज’चे रौप्य महोत्सवी वर्ष
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 03:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जेट एअरवेज या परिपूर्ण सेवा देणाऱ्या भारतातील प्रीमिअर आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने पाच मे २०१८ रोजी २५ वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा मैलाचा टप्पा साजरा केला.  

भारतीय विमान वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याचे श्रेय असलेल्या जेट एअरवेजचे पहिले विमान ९डब्ल्यू३२१ पाच मे १९९३ रोजी मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने उडाले व कंपनीने ‘भारताला जगाशी जोडण्याचा’ प्रवास सुरू केला.

१९९३च्या सुरुवातीच्या काळात केवळ चार एअरक्राफ्टच्या ताफ्याने सहा ठिकाणी सेवा देण्यापासून आज ११९ एअरक्राफ्टच्या ताफ्याने व पार्टनर एअरलाइन्सच्या मदतीने जगभरातील अंदाजे ४५० ठिकाणी सेवा देणाऱ्या जेट एअरवेजने भारतभरातील व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना व फ्रेट व्यवसायाला सेवा देत आणि भारतात व जगात व्यापार व पर्यटनाच्या वाढीला मोठी चालना देत, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्तिशः आखलेल्या व काळजी, देखभाल व वैयक्तिक लक्ष ही वैशिष्ट्ये असलेल्या ब्रँड व सेवाविषयक विचारसरणीने भारतातील हॉस्पिटॅलिटीला नवा आयाम दिला आहे. उत्पादने व सेवा यासाठी लक्षणीय गुंतवणूक करून जेट एअरवेजने आपल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे, देशातील सेवेच्या बाबतीतील प्रोफेशनलझिम बदलला आहे, विमानातही व जमिनीवरही प्रवाशांची मने जिंकणारे गुणवंत प्रोफेशनल असण्याची संस्कृती रुजवली आहे. सेवा देण्याबद्दलच्या कंपनीच्या विशिष्ट विचारांमुळेही हा जागतिक स्तरावर स्वतःचे नाव निर्माण करणारा, विमान प्रवासात प्रवाशांना सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी देणारा भारतातील विशेष ब्रँड ठरला आहे.  

२५ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल म्हणाले, ‘आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक व आनंदाचा आहे; तसेच हा अविस्मरणीय असा मैलाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत, लाखो प्रवाशांना विमानप्रवासाचा आनंद देण्यासाठी आम्ही आजवर केलेल्या प्रवासाचे सुरुवातीचे दिवस अजूनही आमच्या स्मरणात असून, आतापर्यंत प्रवाशांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, पाठिंबा व केलेले कौतुक प्रेरणादायी व गौरवास्पद आहे. त्यांना अशीच सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत व यापुढेही भारताला जगाशी जोडणार आहोत.’

‘आमच्या अपेक्षांहूनही जास्त व सतातत्यपूर्ण पाठिंबा देणाऱ्या आमच्या भागीदारांचाही विशेष उल्लेख करायला हवा. भारतातील विमान वाहतूक क्षेत्र खुले करण्यासाठी व त्यास चालना देण्यासाठी, तसेच प्रवाशांना सर्वत्र विमानप्रवास उपलब्ध करण्यासाठी सरकारनेही पाठिंबा दिला आहे; तसेच जेट एअरवेज परिवारातल्या प्रत्येक सदस्याचा मी ऋणी आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांशिवाय हे यश मिळवणे शक्य झाले नसते,’ असेही गोयल यांनी सांगितले.

रौप्य महोत्सवी वर्षामध्ये, जेट एअरवेजने अंदाजे १६ हजार कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी व कंपनीवर सातत्याने विश्वास ठेवल्याबद्दल व पाठिंबा दर्शवल्याबदद्ल ऋण व्यक्त करण्यासाठी कंपनीने जागतिक नेटवर्कमध्ये जमिनीवर व आकाशात साजरीकरण करायचे ठरवले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link