Next
‘एकता दौड’मध्ये ‘सीओईपी’तील विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रेस रिलीज
Friday, November 02 | 02:50 PM
15 0 0
Share this story



पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या एकता दिवसाच्या निमित्ताने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये २७५ विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.

खासदार अनिल शिरोळे यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सीओईपी मैदानापासून सुरू होऊन जंगली महाराज रस्ता, मॉडर्न महाविद्यालय ते संचेती रुग्णालय अशा मार्गाने पुन्हा सीओईपी महाविद्यालय मैदानावर या दौडची सांगता करण्यात आली.

खासदार शिरोळे यांनी सरदार पटेल यांचे जीवनकार्य, तसेच सरकारने उभारलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. या वेळी विद्यार्थ्यांना ‘एकता शपथ’ देण्यात आली.   

सीओईपी जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. धामणगावकर, महाविद्यालयाचे उपसंचालक भालचंद्र चौधरी, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर चिटणीस सुनील पांडे या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link