Next
‘६६ सदाशिव’ चित्रपटाच्या पोस्टर, म्युझिकचे अनावरण
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:



पुणे : प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या ‘६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिकचे अनावरण दिमाखात सोहळ्यात नुकतेच करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती पुणे टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रवीण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, संगीतकार नरेंद्र भिडे, गायक जसराज जोशी, आर्या आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर वाद–विवादासाठी प्रसिद्ध आहे, याच पुण्यात ६६वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणी भोवती ‘६६ सदाशिव’ची कथा असल्याचे या टीजरमधून दिसते. यापूर्वी आलेल्या पोस्टर मध्ये ‘६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची जी उत्सुकता निर्माण झाली होती ती या टीजरमधून अधिक ताणली गेली आहे.

‘६६ सदाशिव’ चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रवीण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर महेश मांजरेकर, आसावरी जोशी, विजय निकम विशेष भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात तीन गाणी असून, नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. एका वेगळ्या कलेची ओळख करून देणारा ‘६६ सदाशिव’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search