Next
‘वोक्हार्ट’तर्फे पाच हजार स्ट्रेस बॉल्सचे वितरण
प्रेस रिलीज
Tuesday, September 25 | 04:21 PM
15 0 0
Share this story

पोलीस अधिकाऱ्यांना स्ट्रेस बॉलचे वितरण करताना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी

मुंबई : जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून ताण आणि उच्च रक्तदाबामुळे वाढलेल्या हृदयविकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातर्फे खासगी कंपन्या व पोलीस खात्यातील पाच हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना स्ट्रेस बॉल वितरीत केले जाणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात पोलिसांना स्ट्रेस बॉलच्या मदतीने कशा पद्धतीने तणावावर नियंत्रण मिळवता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व स्ट्रेस बॉलचे वितरण करण्यात आले.

जीवनशैली, तणाव, कामाचा दीर्घ कालावधी आणि व्यायामाचा अभाव यांमुळे येणारे हृदयविकाराचे धक्के हे मृत्यूंमागील प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणांना कमी वयातच हृदयविकारांचा सामना करावा लागत आहे, असे दिसून आले आहे.

पोलिसांचा कामाचा कालावधी दीर्घ असतो. त्यांच्यात जंक फूड खाण्याचे प्रमाण अधिक असते. हे सगळे हृदयविकाराकडे घेऊन जाणारे मुख्य घटक आहेत. खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दिलेली असतात. त्यासाठी तरुणवर्ग अटोकाट प्रयत्न करत असतो. ताणापासून मुक्ती मिळवण्याचा धूम्रपान हा सर्वोत्तम मार्ग आहे, असा गैरसमज त्यांच्यात आहे. धूम्रपानामुळे प्रत्यक्षात ताण हलका होत नाही. कामाच्या दीर्घ कालावधीमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि त्यात ताणाचा परिणाम आरोग्यावर होतो. आपण तणावाखाली असतो तेव्हा आपली शरीरे ताठर होतात आणि आपण शारीरिकदृष्ट्या आवळले जातो. स्ट्रेस बॉल दाबल्यास आपण मोकळे होतो. त्यामुळे ताण बॉल दाबण्यापूर्वीच्या तुलनेत कमी होतो.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले, ‘खासगी कंपन्यांतील कर्मचारी, तसेच पोलिसांना या मोहिमेतून आम्ही आवाहन करतो की एक व्यक्ती म्हणून अधिक क्रियाशील व्हा, धूम्रपान टाळा, निरोगी आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि कायम तणावमुक्त राहा.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link