Next
... म्हणून ‘त्या’ महाविद्यालयाने उभारले लाल कंधार गायीचे शिल्प
अनिकेत कोनकर
Monday, September 17, 2018 | 06:08 PM
15 0 0
Share this article:

परभणी : मराठवाडा मुक्तिदिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०१८ रोजी परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात लाल कंधार या देशी गायीचे शिल्प उभारण्यात आले. मराठवाड्यात आढळणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेक गुणांनी युक्त अशा वैशिष्ट्यूर्ण देशी गोवंशाचे जतन आणि संवर्धनासाठी या महाविद्यालयाने मूलभूत कार्य केले आहे. त्या गोवंशाच्या सन्मानासाठी आणखी एक पाऊल म्हणून लाल कंधार जातीच्या सवत्स गायीचे सुंदर शिल्प महाविद्यालयाने उभारले आहे. 

कोल्हापूर येथील कण्हेरी मठाच्या स्वामीजींच्या आशीर्वादाने तेथील शिल्पकार श्रीकांत यांनी हे रेखीव शिल्प तयार केले असून, त्यासाठी भारतीय स्टेट बँकेने अर्थसाह्य केले आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने संपर्क साधला असता, त्यांनी हे शिल्प उभारण्यामागची संकल्पना आणि या गोवंशाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. 

‘दोन-तीनशे वर्षांपूर्वीपासून हा गोवंश स्थानिकांना माहिती आहे; मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्याची नोंद होणे आवश्यक होते. त्यामुळे मराठवाडा विभागातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि परभणीच्या पशुविज्ञान व पशुवैद्यक महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी त्यावर संशोधन केले. १९८५ ते १९८८च्या दरम्यान संशोधनाचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला. त्यानंतर ‘नॅशनल ब्यूरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ या पशुधनाच्या जनुकीय साधनसंपत्तीसंदर्भात संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेकडे त्याची नोंदणी झाली. (नोंदणीकृत देशी गोवंशांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.) त्यानंतरही या महाविद्यालयातर्फे या गोवंशावर संशोधन सुरूच आहे. या उपक्रमाची आठवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी हे शिल्प उभारण्यात आले आहे,’ असे डॉ. नितीन मार्कंडेय यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे आधी तिथे असलेले संकरित गायीचे शिल्प काढून तेथे लाल कंधार गायीचे शिल्प बसविण्यात आले आहे. नोंदणीनंतर लाल कंधार गोवंशावर झालेल्या संशोधनामध्ये डॉ. नितीन मार्कंडेयही सहभागी होते.

‘१९७२ला हे महाविद्यालय सुरू झाले, तो काळ संकरीकरणाचा होता. अधिक दुग्धोत्पादनासाठी संकरीकरण करण्यावर त्या वेळी भर दिला जात होता. त्यामुळे संकरित गायीचे शिल्प उभारण्यात आले होते. आता मात्र अधिक दुधापेक्षा दुधाची प्रत जास्त महत्त्वाची आहे, या बाबीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळेच देशी गोवंश टिकविणे आणि त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. हा संदेश आणि प्रेरणा सर्वांना देण्यासाठी लाल कंधार गायीचे शिल्प उभारण्यात आले आहे. ही कल्पना मांडल्यावर सर्वच पातळ्यांवर तिचे स्वागत झाले आणि ती लवकरच प्रत्यक्षात आली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. त्यामुळे सर्वांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करण्यात आले,’ असे डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले. 

मराठवाड्यात शुद्ध लाल कंधार जातीची तब्बल ८० हजार जनावरे आहेत. मूळ याच वंशाची मात्र संकरित झालेली १५ लाख जनावरे तरी मराठवाड्यात असतील, ज्यांचे कृत्रिम रेतन केल्यास त्यापासून पुन्हा शुद्ध गोवंश मिळवता येऊ शकतो, असे डॉ. मार्कंडेय यांनी नमूद केले.

लाल कंधार जातीची वैशिष्ट्ये :
महाराष्ट्रात जे पाच प्रमुख देशी गोवंश आहेत, त्यापैकी लाल कंधार हा एक. याचे मूळ नांदेड जिल्ह्यात आहे आणि संपूर्ण मराठवाड्यात हा गोवंश आढळतो. पूर्वी होऊन गेलेल्या कंदहार राजाचे साम्राज्य नांदेडमध्ये होते. त्यावरून या भागात आढळणाऱ्या या गोवंशाला लाल कंधार असे नाव मिळाले. या गोवंशाचा रंग लाल असतो.

शेतीकामासाठी उत्तम
‘दोन-तीनशे वर्षांपूर्वीपासून हा गोवंश स्थानिकांना माहिती आहे. पशुपालकांकडून तो डोंगरामध्ये सांभाळला गेला. या गोवंशाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या जातीचे गोऱ्हे शेतीकामासाठी उपयुक्त असतात. अन्य काही देशी गोवंशांप्रमाणे याच्या उपजाती नाहीत. खिलारला १२, तर देवणीला तीन उपजाती आहेत; मात्र लाल कंधारला एकही उपजात नाही. या जातीच्या गायी-बैलांवर डास किंवा अन्य कोणत्याही परजीवींचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ही जात काटक आहे. त्यांचे खूर टणक आणि काळे असतात. त्यामुळे शेतीची अवघड कामेही हा गोवंश लीलया पार पाडतो. खिलार किंवा अन्य काही जातींच्या जनावरांची कातडी पांढरी असल्याने त्यांना वारंवार धुवावे लागते; मात्र या जातीच्या जनावरांची कातडी लाल रंगाची असल्याने त्यांना दररोज स्वच्छ करण्याची गरज नसते. त्यामुळे पाणी वाचते. तसेच या जातीचे बैल वयाच्या १८व्या वर्षापर्यंत शेतीकाम करू शकतात. या जातीच्या बैलजोडीची किंमत एक ते तीन लाख रुपयांपर्यंत असते. प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील हळी-हंडरगुडी येथील जनावरांच्या बाजारात त्यांची विक्री होते. मध्य भारत, गुजरात, आंध्र प्रदेशातील पशुपालकही या जातीचे गोऱ्हे तयार करण्यासाठी हा गोवंश पाळतात,’ असे डॉ. नितीन मार्कंडेय यांनी सांगितले.

दुधासाठीही चांगली
‘ए-टू दूध अर्थात देशी गायींच्या दुधामध्ये लाल कंधारच्या दुधाचाही समावेश होतो. हे दूध पौष्टिक असते. केवळ परदेशी जातीची जनावरेच लवकर माजावर येतात, असा समज आहे; मात्र लाल कंधार गाय नवव्या महिन्यातही माजावर येते. कोकण, तसेच नाशिकमधील काही गोपालकांनीही हा गोवंश पाळला आहे. लातूर जिल्ह्यातील मावलगाव येथील शरद पाटील यांनी सेंद्रिय शेतीसाठी ही जात कशी उपयुक्त ठरू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ दिला आहे,’ असेही डॉ. मार्कंडेय यांनी सांगितले.

संपर्क : डॉ. नितीन मार्कंडेय - ८२३७६ ८२१४१

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ramkrushahari gorakshan ghatnandur About 256 Days ago
At the occasion of 17 september marathvada muktisngramdin it is a very nice decision that on the place of photo of jarasi gay there is the photo of lalkandhari gay has been plased . This is a biggest or important starting towards the jarsi mukta bharat .many many Thanks to markande sir
0
0
Bhairavnath patil About 258 Days ago
गाय घ्याची आहे
0
0
Dr m m Shinde About 269 Days ago
Really good work
0
0
Dr.Rahul Rathod About 269 Days ago
Respected Markandeya sir ,very nice work towards making attention of others regarding conservation of desi breed of ours region marathwada.Congratulations sir
0
0
mithun fafala pawara About 270 Days ago
Nice idol
1
0
Dr.Balaji jadhav About 270 Days ago
खुप सुंदर सर
2
0
Dr.pradipji About 270 Days ago
Sir and COVAS team doing nice great job. Thanks Dr.pradip Animal science center
1
0
Mamde C S About 271 Days ago
Markandeya sir ,very nice work towards making attention of others regarding conservation of desi breed of ours region marathwada.Congratulations sir
2
0
Ashish H Loya About 271 Days ago
Great
1
0
Ashish H Loya About 271 Days ago
Great *Jai Gow Mata - Jai Bharat Mata
0
0
Ravi Marshetwar About 271 Days ago
Dear Shri Markandey sir namaskar. Abhinandan to you and your all staff including administration of MAFSU for removing statue of videshi jercy animal and replacing respectfully with Lal kandhari gaumata's statue.This is a memorable event in the history of post independent era specially in the history of Animal husbandry dept of Maharashtra and for all those deshi gaumata lovers who are rearing indigenous breeds of cows.It is a very proud moment in the history of MAFSU for respecting genepool of indigenous breeds of cows. I am happy that we all are blessed and guided by Shri Adrushya kadsiddheshwar swami of kaneri math Kolhapur. Shri Swamiji is a staunch supporter of indigenous breeds of cows and rearing hundreds of indigenous cows in ashram. I request to the administration of MAFSU to nominate Swamiji's name for PADMA AWARD and NATIONAL GOPALRATNA AWARD for his mountainous work . Regards GIR GAUPALAK Ravi Marshetwar At washim
2
0
Dr . Sudhir Rajurkar About 271 Days ago
Very nice step towards conservation of indeginous breed Congratulations Sir
4
0
संजय About 271 Days ago
उपयुक्त माहिती
2
0

Select Language
Share Link
 
Search