Next
‘माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थे’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
BOI
Monday, January 07 | 01:56 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील ‘अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थे’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. 

सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले स्मारक याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे सरचिटणीस दिलीप राऊत, उपाध्यक्ष प्रशांत एकतपुरे, विश्वस्त रवी चौधरी, सदस्य बी. एस. माळी, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत, दीपक जगताप, हनुमंत टिळेकर आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. या वेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गेली ७५ वर्षे ‘अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था’ शिष्यवृत्तीच्या मार्गाने मदत करण्याचे कार्य करत आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आजवर शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link