Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पथनाट्य सादर
प्रेस रिलीज
Monday, July 30 | 04:28 PM
15 0 0
Share this story



औंध : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकायत या सामाजिक संस्थेमार्फत संविधान जनजागृती कार्यक्रम पथनाट्याच्या माध्यमातून नुकताच सादर करण्यात आला.

‘लोकायत’मध्ये काम करणाऱ्या तुषार रईस, शुभम हळे, तन्मय चव्हाण, स्नेहल बाळकृष्ण शुभांगी, पूजा चिंचोले, फुल्मा एन. एस., सोनी चव्हाण, उदय देशमुख, कल्याणी दुर्गा रवींद्र, निखिल रांजनकर, मयूर गंगावणे आदी तरुणांनी पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधन केले. महाविद्यालयातील तरुणांना संविधानातील मुलभूत हक्क आणि कर्तव्य कळावेत, तसेच स्री-पुरुष समानता, धार्मिक एकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण, मानवतावाद, महिला संरक्षण आदी विषयांवर पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन करण्यात आले.



या वेळी प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘यापुढे महाविद्यालयात लोकायत संस्थेमार्फत विविध विषयांवर पथनाट्य, कार्यशाळा आणि व्याख्याने आयोजित करण्यात येतील. त्यामधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मूलभूतहक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात येईल. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत समाजामध्ये प्रबोधन करण्यात येईल.’

हा कार्यक्रम इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया पवार व प्राध्यापक किरण कुंभार यांच्यामार्फत आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link