Next
शिवळे महाविद्यालयात लेखन, काव्य व संगीत कार्यशाळा
प्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांचे मार्गदर्शन
दत्तात्रय पाटील
Monday, December 17, 2018 | 01:07 PM
15 0 0
Share this story



मुरबाड (ठाणे) : ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके (बाबूजी), ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर (गदिमा) आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग व मुरबाड-शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाच्या शांताराम भाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन, काव्य व संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य शासनातर्फे २०१८-१९ हे वर्ष ‘बाबूजी’, ‘गदिमा’ आणि ‘पुलं’ यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त साहित्य व संगीतविषयक विविध कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन केले आहे. त्याचच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये साहित्य व संगीताविषयी प्रबोधन व्हावे या हेतूने शिवळे महाविद्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली.



प्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे व संतोष वाटपाडे यांनी काव्य कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना काव्याविषयी मार्गदर्शन केले. कथाकार, गजलकार प्रदीप निफाडकर व निकिता भागवत यांनी साहित्य लेखनाची तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवली, तर मिलिंद जोशी व मनीषा जोशी यांनी संगीत कार्यशाळेत अनेक गीते सादर करून संगीत क्षेत्रातील बारकाव्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष गोटीरामभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन भविष्यात मुरबाड तालुक्यातून संगीतकार, कवी, गीतकार, कथाकार निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे व महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा मनोगतातून मांडली. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव बी. आर. हरड उपस्थित होते.



प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक प्रा. एम व्ही पवार यांनी केले. प्रा. व्ही. सी. पाटील यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. मुरबाड तालुक्यातील सुमारे ३२५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. जी. आर. विशे यांसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link