Next
ते फक्त वडील नाहीत, माझे आयकॉनही...!
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीच्या अर्धशतकपूर्तीनिमित्ताने अभिषेकच्या भावना
BOI
Saturday, February 16, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या चित्रपट कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांचा सुपुत्र, अभिनेता अभिषेक बच्चन याने त्यांचे टॅलेन्ट आणि त्यांचा हा प्रवास याबद्दल एक भावूक पोस्ट लिहून इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत.  

‘ते माझे केवळ वडीलच नसून, माझे आयकॉनही आहेत,’ असे अभिषेकने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘माझे वडील, एक चांगला मित्र, मार्गदर्शक, उत्तम समीक्षक, उत्कृष्ट समर्थक, माझे आदर्श, माझे हिरो... ५० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू केला होता आणि आजही ते काम करत आहेत. कामाच्या पहिल्या दिवशी त्यांचा जो उत्साह होता, तोच उत्साह आजही कायम आहे आणि मी तो पाहतो आहे,’ असे अभिषेकने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

इन्स्टाग्रामवर त्यांचे आणि स्वतःचे काही फोटोही अभिषेकने शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवर त्याने अमिताभ बच्चन यांना उद्देशून म्हटले आहे, ‘प्रिय पा, आज मी तुम्हाला सेलिब्रेट करत आहे, तुमच्या टॅलेन्टला सेलिब्रेट करत आहे इतकेच नाही तर तुमचे ध्येय, चिकाटी, तुमची प्रतिभा, तुमचा प्रभाव या सगळ्या गोष्टी मी आज साजऱ्या करत आहे.’ 

हे सांगत असताना अभिषेकने सकाळी घरी घडलेला एक किस्साही शेअर केला आहे. ‘सकाळी मी जेव्हा त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या अर्धशतकपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मी कामावर निघाल्याचे सांगितले आणि ते कुठे निघाले आहेत, असे मी त्यांना विचारले असता, तेदेखील कामावर निघाले असल्याचे त्यांनी सांगितले,’ असे त्याने लिहिले आहे. 

फेब्रुवारी १९६९मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पहिला चित्रपट साइन केला होता, तो म्हणजे ‘सात हिंदुस्थानी.’ त्यानंतर ‘दीवार’, ‘मर्द’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘कुली’, ‘सिलसिला’, ‘अग्निपथ’ आणि अलीकडील काळातला ‘पिकू’ या काही चित्रपटांमधून अमिताभ सर्वांच्या मनात कोरले गेले ते कायमचेच. आजही त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि त्यांची चिकाटी तोंडात बोटे घालण्यास भाग पाडते. 

(अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सिंड्रेला मॅन’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link