Next
कल्याणमध्ये ‘मुलगी झाली चिंता मिटली’ योजनेला प्रारंभ
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : समाजामध्ये बदल घडविण्यासाठी व स्त्री जन्माचा आदर करण्यासाठीच कल्याणमध्ये स्व. मिनाताई ठाकरे कन्यारत्न योजनेला प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती रमाधामचे विश्वस्त चंदूमामा वैद्य यांनी कल्याणमध्ये दिली.

‘मुलगी झाली, चिंता मिटली’ हे घोषवाक्य घेऊन कल्याणचे डॉ. राजन वैद्य यांनी आपल्या खडकपाडा विभागातील व्यंकटेश इस्पितळामध्ये नैसर्गिक किंवा व सीझेरिअनद्वारे जन्माला येणाऱ्या मुलींची प्रसूती मोफत करण्याचे जाहीर केले असून, त्याला स्व. मिनाताई ठाकरे कन्यारत्न स्वागत योजना असे नाव दिले. या योजनेला कल्याणच्या साई हॉलमध्ये चंदूमामा वैद्य, महापौर विनिता राणे, डॉ. राजन वैद्य, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेनेचे गोपाळ लांडगे, महिला जिल्हा प्रमुख विजया पोटे आदींच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

आजच्या काळात स्त्रीने कितीही प्रगती केली असली, तरी मुलींच्या जन्माविषयी नाराजीची मानसिकता समाजात दिसून येते. ही मानसिकता बदलण्यासाठीच ही योजना सुरू केल्याचे चंदूमामा वैद्य यांनी सांगितले. या पूर्वी पुणे व बीड येथील डॉक्टरांनी अशी योजना सुरू केली आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यांत ही योजना प्रथमच सुरू होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या योजनेचे स्वागत केल्याचे चंदूमामा वैद्य यांनी सांगितले.

स्त्री जन्माचा आदर करण्यासाठी आपण ही योजना सुरू केल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. मुलींची मोफत प्रसूती व आईचा सन्मान अशी ही योजना असून, डॉक्टरच स्त्री भ्रुण हत्या करतात हा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी आपण कोणतेही अनुदान घेणार नसून आपल्या खर्चातूनच ही योजना राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१९७२ साली वैद्यकीय प्रवेशासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मदत केली होती. प्रवेश मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी फोन केला व दोन मिनिटांत आपल्याला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्या उपकाराची फेड म्हणूनच स्व. मिनाताई ठाकरे यांच्या नावे आपण ही योजना सुरू करत असल्याचे डॉ. वैद्य यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search