Next
पूरग्रस्तांसाठी उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांचा मदतीचा हात
महसूल अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन
BOI
Friday, August 09, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:

उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश सुपुर्द केला.

पुणे : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाल्याने अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्याच्या उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. महसूल अधिकाऱ्यांनीही पुरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.

माण तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना जलसंधारणाचे काम उल्लेखनीयरित्या केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांना नुकतेच अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. माने यांनी त्या पुरस्काराची सर्व रक्कम पुरग्रस्तांसाठी दिली. हा मदतीचा धनादेश सुरेखा माने यांनी जिल्हासधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी अपर जिल्हााधिकारी रमेश काळे उपस्थित होते.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीसुद्धा सांगली  व कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यारसाठी तातडीने कक्ष उभारून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन विविध विषयासंदर्भात तातडीने जिल्हा स्तरावर  समन्वय अधिकाऱ्यांच्याा नियुक्त्या करून कामाला सुरुवातदेखील केली आहे. बैठकीत उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनीही पुरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले. या वेळी  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार व  अन्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search