Next
नरेंद्र मोदीचे काँग्रेसवर टीकास्त्र!
BOI
Friday, January 27, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

पंजाबमधील जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रचारसभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पहिल्याच सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस हा पक्ष सध्या शेवटच्या घटका मोजत असून सत्तेविना या पक्षाची अवस्था पाण्याशिवाय तडफडणा-या माशासारखी झाल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जी बोट बुडाली आहे, ज्या बोटीत आता काहीच उरले नाही अशा बोटीमध्ये पंजाबची जनता पाय ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंजाबमध्ये अकाली दल – भाजप युतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
 पंजाबमधील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली असून यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. पंजाब ही वीरांची भूमी आहे. पंजाबची आन बान आणि शानमुळे देशाची मान अभिमानाने उंचावते असे सांगत मोदी म्हणाले, काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी पंजाबमधील तरुणांची प्रतिमा मलिन केली. अशा लोकांना पंजाबच्या जनतेने अशी शिक्षा द्यावी की ते पुन्हा कधी पंजाबवर बोट ठेवणार नाही.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search