Next
मनीषा कोईरालाची सेकंड इनिंग
BOI
Friday, February 22, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

मनीषा कोईराला आणि संजय दत्त

नवी दिल्ली : २०१८मध्ये आलेल्या ‘लस्ट स्टोरीज’मधील एक दुःखी-हताश पत्नी किंवा मग ‘संजू’मधील संजय दत्तची आई नसगिस दत्त साकारलेली अभिनेत्री मनीषा कोईराला आता पुन्हा एकदा नव्याने चित्रपटात उतरण्यास सज्ज झाली आहे. आपल्या या कमबॅकला मनीषाने आपली ‘सेकंड इनिंग’ असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मनीषाने आपण पुन्हा काम सुरू करत असल्याचे सांगितले आहे. 

‘ही केवळ माझ्या कामाचीच सेकंड इनिंग आहे असं नाही, तर माझ्या आयुष्याचीही सेकंड इनिंग आहे. त्यामुळे हा माझा आयुष्यातील सर्वांत चांगला टप्पा आहे. आजवर मी आयुष्याबद्दल गंभीर नव्हते, फार विचारी नव्हते. परंतु आता नक्कीच आहे. मला मिळालेला हा सेकंड चान्स मी पुरेपूर वापरणार आहे आणि नव्या जोमाने काम करणार आहे’, अशा शब्दांत मनीषाने आपण पुन्हा चित्रपटांकडे वळत असल्याचे सांगितले. 

१९९१मध्ये आलेल्या ‘सौदागर’ या चित्रपटातून मनीषाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘खामोशी’, ‘गुप्त’, ‘दिल से’ आणि ‘मन’ यांसारख्या हिट चित्रपटांमुळे मनीषा सर्वांचीच लाडकी अभिनेत्री बनली. तिच्या गोड हास्याचा दिवाना नसेल असा विरळाच. मात्र २०११मध्ये तिला कर्करोगासारख्या आजाराने वेढले आणि तिची कारकीर्द थांबली. परंतु या आजाराशी यशस्वीपणे दोन हात करत ती आज पुन्हा आपल्यासमोर उभी आहे.

कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यानंतर मनीषा आता आपली कर्करोगाशी लढाई, यावर लिहित आहे आणि कॅन्सरग्रस्तांना सकारात्मकतेने पुढे जाण्यास प्रेरित करत आहे. याच्याशीच निगडीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ती दिल्लीत आली असताना तिने आपल्या या लढ्याबद्दल आणि पुन्हा नव्याने काम सुरू करण्याबद्दल सांगितले. ‘कॅन्सर या आजाराने मला खूप काही शिकवले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे. या मिळालेल्या नव्या आयुष्यामुळे मला हे कळले, की आता जेवढं आयुष्य मिळालं आहे, तेवढं खूप छान आणि आनंदात जगायचं आहे’, असे ती म्हणाली. 

दरम्यान आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटातून मनीषा पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाबाबत आपण आनंदी असून ही आपल्यासाठी नवी आणि चांगली संधी असल्याचे तिने म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search